Sleeping Age : सध्या सगळ्याच क्षेत्रात कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धावपळीचं आयुष्य , कामाच्या खाण्या पिण्याच्या बदललेल्या सवयी या सर्वांचा परिणाम आरोग्यावर होत असतो. (stress issues) परिणामी आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांना सध्या आपल्याला समोर जावं लागत आहे. यामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येणारी समस्या म्हणजे निद्रानाश . अनेकदा चिंता, मानसिक तणावाचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याला रात्री नियमित सात-आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
रात्रीच्या मानाने तुम्हाला हवं ते दिवसा खाणं टाळा. रात्री हलका आहार घ्या आणि तिखट तसंच मसालेदार पदार्थ देखील टाळा. कारण पित्त आणि अपचनाचा त्रास झाल्यास तुमची झोप बिघडू शकते.
काही लोकं सकाळी व्यायाम करण्याऐवजी संध्याकाळी उशीरा व्यायाम करतात. यामुळे निद्रानाशाचा त्रास अधिक शक्यता आहे. व्यायाम सकाळीच करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला संध्याकाळी व्यायाम करायचा असल्यास तो झोपण्यापूर्वी किमान चार तासआधी करावा.