तुमच्या वयानुसार कितीवेळ हेडफोन वापरले पाहिजे? पाहा काय सांगतात तज्ज्ञ?

Health Tips In Marathi : प्रवास असो किंवा फावला वेळ. अशावेळी अनेकजण मोबाईलवर टाइमपास करत असतात. मोबाईल टाइमपास करताना गाणी ऐकणं, चित्रपट पाहणे, फोनवर बोलणे यासाठी हेडफोनचा जास्त वापर केला जातो. पण हेच हेडफोन आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का? 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 19, 2024, 05:01 PM IST
तुमच्या वयानुसार कितीवेळ हेडफोन वापरले पाहिजे? पाहा काय सांगतात तज्ज्ञ? title=

How many hours to wear headphones : आजच्या युगात जसा मोबाईल गरजेचा आहे, तसाच हेडफोन किंवा इअरफोन गरजेचे झाले आहे. प्रवासात, रिकामी वेळेत, कॉलवर बोलण्यासाठी असो मोबाईलसोबत हेडफोन किंवा इअरफोनचा ही वापर केला जातो. पण तज्ज्ञांच्या मते, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा जास्त वेळ इअरफोन वापरणे यामुळे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे कानाला संसर्ग होणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, ऐकू न येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे इअरफोन आणि हेडफोन वापरण्याची योग्य पद्धत कोणती हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्या वयोगटातील व्यक्तींने कितीवेळ इअरफोन आणि हेडफोन वापरले पाहिजे ते जाणून घ्या...

एका सर्वेक्षणानुसार 47 टक्के लोक गाणी ऐकतात तर 42 टक्के हेडफोनच्या मदतीने कॉलवर बोलत असतात. तर 20 टक्के लोक हे काम करण्यासाठी मन एकाग्रत व्हावे म्हणून हेडफोनचा वापर करतात. त्याचबरोबर 20 टक्के लोक हेडफोनचा वापर फॅशन ॲक्सेसरीज म्हणून करतात. पण हेडफोन असो किंवा इअरफोन कानासाठी घातकच आहे. जर तुम्ही वापरत असाल तर वयानुसार किती आणि योग्य कालावधी हेडफोन वापरले पाहिजे. जर तुम्हीही हेडफोन खूप वापरत असाल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. 

19 ते 29 वयोगटातील: या वयोगटातील व्यक्तींनी त्यांचा हेडफोन किंवा इअरफोनचा वापर दर आठवड्याला कमाल 7.8 तास, दरमहा 33.9 तास आणि वर्षाला 405.6 तासांपर्यंत मर्यादित ठेवावा.
30 ते 49 वयोगटातील: 30 ते 49 वयोगटातील लोकांनी त्यांचे हेडफोन किंवा इअरफोनचा वापर दर आठवड्याला 5.5 तास, दरमहा 23.9 तास आणि प्रति वर्ष 286 तासांपर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे.
50 ते 79 वयोगटातील: 50 ते 79 वयोगटातील व्यक्तींनी दर आठवड्याला जास्तीत जास्त 5.2 तास, दर महिन्याला 22.6 तास आणि प्रति वर्ष 270.4 तासांचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

जेव्हा तुम्ही हेडफोन वापरता असाल तर त्याचा आवाज 105-110 डेसिबलपर्यंत नसावा. शक्य तिथं आवाज कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. याचे कारण असे की संशोधनात असे म्हटले आहे की जर कोणतेही गाणं उपकरण 85 dB पेक्षा जास्त असेल आणि 2 तास चालले तर ऐकण्याची शक्यता कमी होऊ शकते. तसेच जेवढ्या मोठ्या आवाजे गाणी ऐकता तेवढाच तुमच्या कानाला इजा होऊ शकते. मोठ्या आवाजाचे हेडफोन एका तासापेक्षा जास्त काळ वापरू नका.