अळशी - झटपट वजन घटवण्याचा हेल्दी पर्याय !

वजन घटवणार्‍यांसाठी त्याच्या आहारावर अनेक बंधन पाळणं गरजेचे आहे. 

Updated: Jun 26, 2018, 04:46 PM IST
अळशी -  झटपट वजन घटवण्याचा हेल्दी पर्याय !  title=

मुंबई : वजन घटवणार्‍यांसाठी त्याच्या आहारावर अनेक बंधन पाळणं गरजेचे आहे. आहारासोबत व्यायामदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र वजन घटवणार्‍यांसाठी 'अळशी' अत्यंत फायदेशीर ठरते. वजन घटवण्यासाठी अनेक बीया फायदेशीर ठरतात. त्यापैकी एक म्हणजे अळशी. 

कशी ठरते अळशी फायदेशीर ?  

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड 

अळशीमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे फॅटी अ‍ॅसिड आढळते. यामुळे शरीरातील दाह कमी करण्यास मदत होते. तसेच thermogenic घटक शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करते.  

भूकेवर नियंत्रण 

अळशीमधील फायबर घटक अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवते. यामुळे शरीराचा मेटॅबॉलिक रेट सुधारतो. पचन संस्थेच्या कार्याला चालना मिळते. भूकेवर नियंत्रण राहिल्याने अनावश्यक कॅलरीज वाढण्याचा धोका कमी होतो. 

प्रोटीन घटक 

अळशीमध्ये फायबर घटक मुबलक असतात. यामुळे झपाट्याने वजन घटवण्यास मदत होते.  सोबतच अळशीचे ७ आरोग्यदायी फायदेदेखील नक्की जाणून घ्या. 

आहारात वजन घटवण्यासाठी कसा कराल अळशीचा वापर ? 

सलाड किंवा सूप्सवर अळशीची पूड मिसळणे फायदेशीर आहे. 

वजन घटवणार्‍यांसाठी कोल्ड प्रेस्ड अळशीचं तेलदेखील वापरणं उपयुक्त ठरते.  

वजन घटवणार्‍यांसाठी अळशीचा नियमित आहारात 2-4 टेबलस्पून वापर करणं गरजेचे आहे. 

अळशीचे लाडू मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेच्या वेळेस खाणं फायदेशीर आहे.

अळशीचे  दुष्परिणाम 

आहारात अळशीचा समावेश करणं आरोग्यवर्धक असले तरीही अतिसेवनामुळे डायरियाचा त्रास होऊ शकतो. 

शरीरात फायबर्सयुक्त घटक अधिक प्रमाणात गेल्यास पोटात गॅस होणं, बद्धकोष्ठतेचा त्रास होणं हा त्रासदेखील जाणवू शकतो. 

काही जणांना अळशीच्या बीयांमुळे पोटात अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होण्याचाही धोका असतो. यामुळे पोटात दुखणे,मळमळणे, उलट्या असा त्रास होतो. अवघ्या 'दहा' रूपयांच्या या नैसर्गिक उपायाने घटवा झटपट वजन !