मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे. हा त्रास वेदनादायी असला तरीही या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेकांमध्ये या त्रासाची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय मदत घेतली जाते. फास्टफूट, अरबट चरबट पदार्थ, मसालेदार पदार्थांवर ताव मारण्याची सवय यामुळे केवळ जीभेचे चोचले पुरवले जातात. मात्र खाण्याच्या अशा सवयींमुळे पचनाचे आजर बळावतात. मूळव्याध जडण्यामागेदेखील अशीच कारणं असतात.
सुरूवातीच्या टप्प्यामध्ये मूळव्याधीच्या समस्येकडे लक्ष दिल्यास त्याचे स्वरूप गंभीर होण्याचा धोका कमी असतो. याकरिता काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.
कडुलिंबाच्या लिंबोळ्या आणा. त्यावरील साल काढून आतील बीज काढा. हे बीज कुटून चिचुक्याऐवढ्या 21 गोळ्या करा. या गोळ्या नियामित दूधासोबत घ्याव्यात.
या उपायादरम्यान आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मांसाहार, पचायला जड असणारे पदार्थ आहारात टाळा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !
रूईच्या पानांमधील चीक काढा. यामध्ये हळद मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टचा केवळ एक ठिपका त्रास होत असलेल्या जागी लावा. नियमित सात दिवस हा उपाय करावा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल. यासोबतच मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय
महत्त्वाची टीप - सदर उपाय हे 'आपली माती आपली मानस' या युट्युब चॅनलवर सांगितले. हे केवळ घरगुती उपाय आहेत. त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 'झी 24 तास' कोणत्याही उपायांच्या परिणामांची जबाबदारी घेत नाही. व्यक्तीपरत्वे उपायांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.