मुंबई : जीवनाच्या उतार वयामध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे त्वचेवरील चामखीळ. शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. शरीरासाठी त्या धोकादायक नसल्या तरी त्यामुळे शरीराचे सौंदर्य मात्र बिघडते. काही वेळेस शस्त्रक्रियेच्या माध्यमातून चामखीळ काढून टाकतात. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा शरीरावर चामखीळ येतात. चामखीळला मोस म्हणून देखील ओळखले जाते. चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय
- सफरचंदचं व्हिनेगर : मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुकत जाईल.
- लिंबाचा रस : लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.
- बटाट्याचा रस : बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.
- अननसाचा रस : मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.
- बेकिंग सोडा : चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.
- लसून : लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.