मुंबई : पोट नियमित साफ होत नसल्यास तोंड येण्याची समस्या बळावते. माऊथ अल्सर्स झाल्यानंतर खाता किंवा पिताना देखील त्रास होतो. हा त्रास नियमित होणारे तर हैराण होतात. पण आता काळजी करु नका. या सोप्या घरगुती उपायांनी तोंड येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. जाणून घ्या कोणते आहेत ते उपाय...
माऊथ अल्सर्स ठिक करण्याचा सोपा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी त्यावर तूप लावा. असे केल्याने रातोरात त्रास कमी होतो.
एक लीटर पाण्यात १० ग्रॅम हळद घालून ते पाणी उकळवा. थंड झाल्यानंतर दिवसातून दोनदा त्या पाण्याने गुळण्या करा. हा उपाय दोन दिवस केल्याने माऊथ अल्सर्सवर आराम मिळेल.
याशिवाय तोंड येण्याच्या समस्येवर कापूर उपयुक्त ठरेल. त्यासाठी ५० ग्रॅम तूप गरम करा. त्यात ६ ग्रॅम कापूर घाला आणि गॅसवरुन उतरवा. ते तूप माऊथ अल्सर्सवर लावल्यास ते लवकर ठीक होण्यास मदत होईल.