मुंबई : बऱ्याचदा लोकांसोबत असं घडतं की, त्यांच्या तोंडाची चव अचानक निघून जाते. म्हणजेच काय तर त्यांचं तोंड कडू होतं आणि त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही. बऱ्याचदा आपल्याला हे ताप आल्यामुळे किंवा सर्दीमुळे होतं. पण कधी कधी तोंडाला खराब चव येण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तोंडाची खराब चव सहज दूर करता येते.
तोंडाची खराब चव दूर करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेली हळद खूप फायदेशीर ठरू शकते. तोंडाची चव सुधारण्यासाठी लिंबाचा रस थोड्या हळदीत मिसळून दातांवर लावा. हळद आणि लिंबाची ही पेस्ट जिभेवर आणि हिरड्यांवरही लावा. काही वेळाने स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. हे काम दिवसातून दोनदा करावे. असं केल्याने तुमच्या तोंडाची चव पुन्हा येईल.
तोंडाची चव परत आणण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. यासाठी थोडा खाण्याचा सोडा घ्या आणि त्यात 5-6 थेंब लिंबाचा रस घाला. या पेस्टने दात स्वच्छ करा. आम्ही तुम्हाला सांगतो की बेकिंग सोडा तोंडाची पीएच पातळी नियंत्रित करतो. या युक्तीचा अवलंब करून तोंडाची चव सुधारली जाऊ शकते.
याशिवाय गरम पाण्यात मीठ घालून गार्गलही करू शकता. अशा प्रकारे तोंडाची चवही सुधारता येते. तुम्ही ही पद्धत दिवसातून दोन किंवा तीन वेळा करा. मिठात असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात.
तुम्ही दालचिनी वापरून तोंडातील खराब चव देखील बरी करू शकता. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात दालचिनी पावडर मिसळा. या द्रावणात थोडेसे मध देखील घाला. आणि या द्रावणाने तोंड स्वच्छ धुवा.
यासोबतच कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून गार्गलही करू शकता. अशा प्रकारे तोंडाची खराब चव बरी होऊ शकते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी तोंडाची पीएच पातळी सुधारते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)