डासांना दूर ठेवण्यासाठी यापेक्षा सोपे उपाय तुम्हाला माहित नसतील!

काही सोपे उपाय ज्यामुळे डासांपासून तुमचं संरक्षण होण्यास मदत होईल. 

Updated: Jun 6, 2021, 05:56 PM IST
डासांना दूर ठेवण्यासाठी यापेक्षा सोपे उपाय तुम्हाला माहित नसतील! title=

मुंबई : गरमीच्या दिवसांत आणि पावसाळ्याच्या दिवसांत डासांचा त्रास प्रचंड होतो. पावसाळ्यामध्ये डासांची पैदासही अधिक होते. डासांच्या चावण्याने मलेरिया, डेंग्यू तसंच इतर गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. तुम्हाला देखील जर डासांच्या चावण्याने त्रस्त असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे डासांपासून तुमचं संरक्षण होण्यास मदत होईल. 

डासांच्या चाव्यापासून मुक्ती मिळावी यासाठी खास घरगुती उपाय

दालिचीनीचा स्प्रे

दालचिनी आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. मात्र तुम्हाला माहितीये का ही दालिचीनी तुम्हाला डासांपासूनही वाचवू शकते. यामध्ये सिनानेल्डीहाइड व सिनेमाइल अॅसीटेट सारखे घटक असतात. हे घटक डासांपासून दूर राहण्यासाठी मदत करतात. याचा स्प्रे तयार करण्यासाठी दालचिनीचं तेलाचे 10 थेंब 30-40 मिलीलीटर पाण्यामध्येमध्ये मिसळा. हा स्प्रे बॉटलमध्ये भरून शरीराच्या ज्या भागांवर डास चावण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी स्प्रे करा.

रबिंग अल्कोहोल

रबिंग अल्कोहोल आजकाल सॅनिटाझर तयार करण्यासाठी वापरलं जातं. मात्र याचा वापर डासांना दूर ठेवण्यासाठी देखील केला जातो. याचा वापर करण्यासाठी तुमच्या आवडीच्या इसेंशियल ऑईलचे 10 थेंबांमध्ये 1 चमचा रबिंग अल्कोहोल आणि पाणी मिसळा. या सोलिॉ्यूशनचा स्प्रे रूममध्ये मारावा.

लसूण स्प्रे

लसूणमध्ये एलिसीन असतं जे डासांना दूर ठेवण्यासाठी फार प्रभावी ठरतं. याचा वापर करण्यासाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या 1 चमचा मिनरल तेलमध्ये रात्रभर भिजवून ठेवाव्या. त्यानंतर या मिनरल तेलात 1 चमचा लिंबाचा रस आणि 2 कप पाणी घालावं. एका बॉटलमध्ये भरून घराजवळ असलेल्या झाडाझुडुंपाजवळ हा स्प्रे करावा.

बेकिंग सोडा आणि विनेगर

बेकिंग सोडा आणि विनेगर एकत्र मिसळल्यास कार्बनडाइऑक्साइड गॅस तयार होतो. हा गॅस डास चावण्यापासून प्रतिंबध करण्यास मदत करतो. हे बनवण्यासाठी 1 कप विनेगरमध्ये 1/4 कप बेकिंग सोडा मिसळावा. या मिश्रणाला खोलीच्या बाहेर स्प्रे करावं.