केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल

घरगुती आयुर्वेदिक तेल   

Updated: Dec 3, 2019, 02:48 PM IST
केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल title=

मुंबई : केसगळती, केसांमधील कोंडा इत्यादी केसांच्या समस्यांनी प्रत्येकच जण चिंतेत असतो. योग्य उपचारासाठी बाजारात अनेक तेल उपलब्ध आहेत. परंतु अनेक वेळा महागड्या उत्पादनातूनही केसांना पाहिजे असलेले पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून तुम्ही घरच्या घरी काही मिश्रण एकत्रित करून आयुर्वेदिक तेल तयार करू शकता.

त्यासाठी ब्राह्मी पावडर, आंवळा पावडर, भृंगराज पावडर, जटामांसी पावडर आणि नागरमोथा पावडर २५ ग्रॅम घ्या. त्याचप्रमाणे कांद्याचा रस २ किंवा ३ चमचे, मेहंदी आणि मेथीच्या दाण्यांची पेस्ट, कढीपत्ता घ्या. 

त्यानंतर  एका लोखंडी भांड्यात वरील सर्व साहित्य एकजीव करा. त्यामध्ये पाणी टाकून ते चांगल्या प्रकारे दोन दिवस भिजत ठेवा. आता या मिश्रणात एरंडेल तेल, नारळाचे तेल आणि तिळाचे तेल घालून हलक्या आचेवर शिजवा. जेव्हा पाणी आटून खाली फक्त तेल शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा.

आता या मिश्रणाला गाळा आणि कोणत्याही हवाबंद बाटली मध्ये भरून ठेवा. दररोज झोपण्या पूर्वी हे तेल कोमट करून लावल्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. सोबतच केस घनदाट आणि आकर्षक होण्यासही मदत मिळेल.