High Cholesterol: चालताना पायांमध्ये दिसून येतात हाय Cholesterol ची 'ही' लक्षणं

उच्च कोलेस्टेरॉलची काही चिन्हं पायातही दिसतात

Updated: Aug 27, 2022, 06:52 AM IST
High Cholesterol: चालताना पायांमध्ये दिसून येतात हाय Cholesterol ची 'ही' लक्षणं title=

मुंबई : शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचा थेट संबंध तुमच्या जीवनशैलीशी असतो. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्टेरॉल आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे ते आकुंचन पावू लागतात आणि रक्तप्रवाहही थांबतो. 

बर्‍याच वेळा उच्च कोलेस्टेरॉलची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत आणि ती तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू जमा होऊ लागते. धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे छातीत दुखणं, हृदयविकार आणि पक्षाघात इत्यादी अनेक प्रकारचे आजार सुरू होतात. 

अशा परिस्थितीत, उच्च कोलेस्ट्रॉलची चिन्हे वेळीच ओळखणे फार महत्वाचे आहे. उच्च कोलेस्टेरॉलची काही चिन्हं पायातही दिसतात.

पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणजे?

शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते. प्लाक हा कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांनी बनलेला मेणासारखा पदार्थ असतो. रक्तवाहिन्यांमध्ये जास्त प्रमाणात प्लाक जमा झाल्यामुळे, ते खूप आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्त प्रवाह मोठ्या प्रमाणात कमी होतो. रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी प्लाक जमा होण्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. 

चालताना पाय दुखणे

पेरिफेरल आर्टरी डिसीजमध्ये चालताना पाय दुखतात. ही वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकते. आणि कधी कधी उठताना किंवा बसताना अचानक पाय दुखतात. काही वेळ विश्रांती घेतल्यावर ही वेदना स्वतःच बरी होते.

पॅरिफेरल आर्टरी डिसीजची इतरही अनेक लक्षणं आहेत 

  • पायांचे केस गळणं
  • पाय सुन्न होणं आणि कमकुवत होणं
  • पायाचं नखं तुटणं
  • पायाचा रंग पिवळा किंवा निळा होतो
  • पायांच्या स्नायूंचं आकुंचन