High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Updated: Oct 11, 2022, 09:45 AM IST
High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश  title=

Foods To Reduce Cholesterol: कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो नसा अर्थात शिरांमध्ये वाढत गेला तर रक्तप्रवाह नीट होत नाही. रक्तप्रवाहासाठी अडथळा ठरतो. वाढलेल्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे, कारण ते काही वेळा घातक ठरु शकते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकाराच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. योग्य जीवनशैलीद्वारे तुम्ही उच्च कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही गोष्टींपासून दूर राहणे देखील आवश्यक आहे.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी...

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओट्सचे सेवन केले जाऊ शकते. खरं तर, ओट्समध्ये विरघळणारे फायबर आढळते. हे रोज सकाळी नाश्त्यात खा. तुम्हाला हवे असल्यास ते दुधात मिसळून किंवा तिखट करून खाऊ शकता.

सुका मेवा
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काजू, अक्रोड, बदाम इत्यादी सुक्या फळांचे सेवन करावे. सुक्या मेव्यामध्ये भरपूर फायबर आढळते. याशिवाय प्रथिने आणि आवश्यक पोषक घटक त्यात असतात.

सफरचंद 
सफरचंद खाणे खूप फायदेशीर आहे. असे म्हणतात की रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. सफरचंदामध्ये आहारातील फायबर आढळतो ज्यामुळे शिरामध्ये जमा होणारे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

सोयाबीन
सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. टोफू, सोया दूध यासारख्या सोयाबीनपासून बनवलेल्या गोष्टी उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सोयाबीन आणि टोफू वेगवेगळ्या प्रकारे बनवून तुमच्या आहारात समाविष्ट करु शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)