Heart Attack Warning Sign: हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी काही संकेत मिळतात. त्यामुळे तुम्ही या 10 गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. हृदयविकाराचा झटका जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण बनले आहे. भारतातही अनेक रुग्ण आहेत. आपल्या देशात तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. जे रक्तात खराब कोलेस्टेरॉल जमा होण्याचे कारण बनते. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होते तेव्हा रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हा रक्तदाब वाढतो आणि नंतर हृदयविकाराचा झटका आणि तिहेरी रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत ते कसे टाळावे, हे जाणून घ्या.
हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. परंतु याआधी आपले हृदय अनेक समस्यांमधून जात असते. जेव्हा समस्या हाताबाहेर जाते तेव्हा मोठा धक्का बसतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, आपले शरीर अनेक सिग्नल देते. ज्याकडे दुर्लक्ष करुन धोक्यापासून सुटका होत नाही. नुकतेच महिलांवर एक संशोधन करण्यात आले, ज्यानुसार हृदयविकाराच्या झटक्याच्या 4 आठवडे आधी आपले शरीर धोक्याचे संकेत देते. (अधिक वाचा : Winter health tips: 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावे, केव्हा मिळते व्हिटॅमिन D?)
जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या सुमारे 1 महिन्यापूर्वी त्याचे धोक्याचे संकेत दिसायला लागतात. हा अभ्यास 500 हून अधिक महिलांवर करण्यात आला आणि त्यांना हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवण्यात आले. सुमारे 95 टक्के महिलांनी सांगितले की, त्यांच्या शरीरात एक महिन्यापूर्वीच काही लक्षणे दिसू लागली आहेत. 71 टक्के लोकांना थकवा जाणवला. तर 48 टक्के लोकांना झोपेशी संबंधित समस्या होत्या. याशिवाय छातीत दाब, छातीत दुखणे अशा समस्या होत्या.
तुमच्या शरीरात खालीलपैकी कोणतीही समस्या असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आवश्यक चाचण्या करा, कारण ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
1. हृदयाची धडधड अधिक वाढणे
2. भूक न लागणे
3. हात आणि पायांना मुंग्या येणे
4. रात्री श्वास लागणे (धाप लागणे)
5. अशक्तपणा किंवा हातात जडपणा येणे
6. नेहमी थकवा जाणवणे
7. झोप न लागणे
8. अपचनाचा त्रास होणे
9. नैराश्यात भर पडणे
10. दृष्टी क्षीण होणे (नजर कमजोर होत जाणे)