मुलांसाठी ब्रेकफास्टचे '4' हेल्दी टेस्टी पर्याय !

सकाळी मुलांना वेळेत उठवून शाळेसाठी तयार करणं हे प्रत्येक आईसाठी आव्हानचं असतं. 

Updated: Jul 4, 2018, 08:13 PM IST
मुलांसाठी ब्रेकफास्टचे '4' हेल्दी टेस्टी पर्याय ! title=

मुंबई : सकाळी मुलांना वेळेत उठवून शाळेसाठी तयार करणं हे प्रत्येक आईसाठी आव्हानचं असतं. मुलांच्या वाढीसाठी त्यांचा आहार जपणं आवश्यक आहे. आहारातून पूरक पोषक घटकांचा समावेश होणंदेखील गरजेचे आहे. मग मुलांना अवेळी लागणार्‍या भूकेवर किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी या काही हटके पदार्थांचा विचार नक्की करा. 

पराठे - 

मुलांच्या आहारात भाज्यांचा समावेश कसा करावावा? हे प्रत्येक आईसमोर आव्हान असते. मग त्यांना पराठ्यांद्वारा त्याच्या प्लेटमध्ये ठेवू शकता. सार्‍याच भाज्यांचे अगदी कलरफूल अंदाजात पराठे बनवल्यास ते हेल्दी आणि टेस्टी होतात.  

स्मुदी - 

दूधात किंवा दह्यामध्ये फळं मिसळून आहारात त्याचा स्मुदी म्हणून समावेश करता येऊ शकतो. मात्र दूध किंवा दह्यासोबत आंबट फळांचा वापर कटाक्षाने टाळा. त्याऐवजी मुलांना थेट फळं खाण्याची सवय लावा. 

न्यूडल्स -

न्यूडल्सचं वेड कमी करायचं असेल तर त्यांना शेवयांचा उपमा किंवा गव्हाच्या, मल्टि ग्रेन पीठांपासून बनवलेले न्यूडल्स बनवून द्या. यामध्ये भाज्यांचा समावेश केल्यास ते अधिक पोष्टिक होतात. 

ओट्स-  

मुलांना सकाळी नाश्त्याला ब्रेड, बिस्टिटं देणं टाळा. त्याऐवजी दूधात ओट्स आणि एखादं फळ मिसळून देणं फायदेशीर ठरेल. यामुळे मुलांसाठी ही एक रिफ्रेशिंग सुरूवात ठरेल.