प्रजासत्ताकदिन विशेष : झटपट तयार होतील असे हेल्दी टेस्टी 'तिरंगी' पदार्थ

यंदा भारत 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 25, 2018, 01:05 PM IST
प्रजासत्ताकदिन विशेष : झटपट तयार होतील असे हेल्दी टेस्टी 'तिरंगी' पदार्थ  title=

मुंबई : यंदा भारत 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

अनेकजण सकाळी उठून झेंडावंदन करतात. यादिवशी तुम्हांला सुट्टी असेल आणि स्वयंपाकघरात कुकींग करताना या दिवसाचे सेलिब्रेशन करणार असेल तर काही तिरंगी पदार्थ नक्की बनवून पहा.  झटपट आणि हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी खाण्याचा रंग वापरण्याऐवजी या पदार्थांमध्ये नैसर्गिक स्वरूपातील पदार्थांचा वापर करा.  

नैसर्गिक रंगांचा कसा कराल वापर ? 

केशरी रंग  - केशरी रंगासाठी गाजर, केशर सिरप, केशराच्या काड्या, भोपळा अशा पदार्थांचा वापर करा. 

पांढरा रंग - पांढर्‍या रंगासाठी ब्रेड, भात, अंड्यातील पांढरा भाग वापरू शकता.  

हिरवा रंग - हिरव्या रंगासाठी कोथिंबीर, पालक, हिरव्या पालेभाज्यांचा वापर करू शकता.  

तिरंगी रेसिपीचे काही पर्याय  

पास्ता - आवडीनुसार आणि तुम्ही नेहमी बनवता तसाच पास्ता बनवा. फक्त त्याचे तीन वाटे करून उरलेल्या दोघांमध्ये रंग मिसळा.  

ब्रेड सॅन्डव्हिच - आबालवृद्धांना हामखास आवडणारा एक पदार्थ म्हणजे सॅन्डव्हिच. यामध्ये ब्रेडचा पांढरा कायम ठेवून एका बाजूवर शेजवान चटणी आणि दुसर्‍या बाजूला हिरवी चटणी लावा.  

पुलाव - पुलाव हा हमखास घराघरात बनवला जाणारा आणि झटपट तयार होणारा एक पदार्थ आहे. यामध्ये भाज्यांचा वापर रंगांनुसार करू शकता. गाजर आणि फरसबीचा योग्य वापर करून तुम्ही हा तिरंगी पुलाव बनवू शकता. 

तिरंगी क्रॅकर्स - बाजरात मिळणार्‍या क्रॅकर्सवर गाजराचा किस, चीझचे तुकडे आणि हिरव्या रंगासाठी फरसबी किंवा सिमला मिरचीचा वापर करा.  

पिझ्झा - पिझ्झ्यावरदेखील तुम्ही तिरंगी रंगाचे टॉपिंग करून तो हेल्दी आणि टेस्टी बनवू शकता.