Tips To Reduce Stress : आज लहान मुलगा असो मोठी मंडळी एका तणावाखाली वावरताना दिसतात. एका संशोधनातून सिद्ध झालं आहे की, देशातील लोकांच्या तणावाची पातळी (Stress Level) मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसतं आहे. सेंटर ऑफ हीलिंग (TCOH) च्या संशोधनानुसार, 74 टक्के भारतीय हे तणावग्रस्त आहेत. तर 88 टक्के लोकांनी एंग्जाइटीची समस्या आहे. लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांना अभ्यास, करिअर यांचं टेन्शन आहे. तर मोठ्या लोकांना नोकरी, पैसा आणि नातेसंबंध आणि नैराश्याने विळखा घातला आहे. (health tips To Reduce Stress this home remedies reduce stress and 3 types of stress Mental Health)
तणावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही जर तणावग्रस्त असाल हे कसं ओळखू शकतो आपण? तर तज्ज्ञांच्या मते, तणाव असल्यास आपल्या शरीरात एड्रेनालाईन हे द्रव्य वेगाने संचारतं. त्याचा परिणाम हृदयाचे ठोके वाढण्यावर होतो. तुम्हाला अचानक खूप घाम येतो, अंगावर काटा येतो किंवा प्रचंड भीती तुम्हाला वाटू लागते. याला तणाव असं म्हटलं जातं. तर ॲक्युट, एपिसोडिक ॲक्युट आणि क्रॉनिक स्ट्रेस असे तणावाचे तीन प्रकार असतात.
ॲक्युट स्ट्रेस डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्य संबंधीत आहे. तणावाची ही स्थिती एखाद्या वेदनादायक घटनेमुळे तुम्हाला होते. हा तणाव तुम्हाला घटनेनंतर 3 मिनिटांनंतर सुरु होतो आणि जवळपास 30 दिवस तुमच्यासोबत असतो. यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेयर्सनुसार जवळजवळ 33 टक्के लोकांना ही समस्या आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तीव्र तणावात असते, अशा तणावाला एपिसोडिक ॲक्युट स्ट्रेस असं म्हटलं जातं. या स्थितीत तुम्हाला सतत दडपणाखाली असल्यासारखं वाटतं. त्याशिवाय नेहमी चुकीच्या गोष्टी तुमच्यासोबत घडत आहे असं जाणवतं. या तणावाचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने ही चिंतेच लक्षण आहे.
या स्थितीमध्ये तुम्ही तणावग्रस्त असला तर शरीरात कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईन नावाची हार्मोन्स संक्रमण करतात. यापरिणाम तुमच्या हृदयाचे ठोके आणि तुमच्या श्वासोच्छवासावर होतो. जास्त तणावाच्या या परिस्थितीला क्रॉनिक स्ट्रेस असं म्हटलं जातं. या अवस्थेत तुम्हाला अती नैराश्य, रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवू लागतात.
रक्तदाब आणि नाडी वाढते
श्वासोच्छवासाचा वेग वाढतो
पचनसंस्था मंदावते
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
स्नायू अधिक ताणले जातात
तीव्र वेदना
निद्रानाश
कमी सेक्स ड्राइव्ह
ड्रग्ज आणि अल्कोहोलचा आहारी जाणं
पाचक समस्या
डोकेदुखी
खूप किंवा खूप कमी खाणे
लक्ष केंद्रित करण्यात आणि निर्णय घेण्यात अडचण
थकवा
पोट वारंवार खराब होणं
वारंवार आजारी पडणं
शारीरिक वेदना
मान आणि खांद्या दुखणे
चक्कर येणं
1. डान्स, पोहणे, एरोबिक्स, योग आणि गरम पाण्याने आंघोळ
2. संतुलित आहारासोबत कॅफिनचे सेवन कमी करणं
3 मित्र आणि कुटुंबाच्या सान्निध्यात वेळ व्यतित करणं
4. स्वत: ची काळजी घेणे
5. भरपूर हसणं, ध्यान करणं आणि कृतज्ञतेचा सराव करणं फायदेशीर ठरतं.
बाहेर फिरायला जाणं
पाळीव प्राण्याला मिठी मारणे
श्वान घरी पाळण्यासाठी आणा
स्वच्छेकडे लक्ष द्या
लॉन बिन चप्पला फिरा
संत्र्याचा रस पिणं फायदेशीर
गाणे हे सर्वात उत्तम उपाय
संज्ञानात्मक (Cognitive behavior therapy) वर्तन थेरपी (CBT)
एवोकॅडो आणि केळी
चहा
स्विस चार्ट
फॅटी फिश
गाजर
दही
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)