Health Tips : तुम्हालाही 'या' वाईट सवयी असतील, तर शुगर वाढलीच समजा!

Diabetes : सध्याच्या धावपळीच्या जीवनात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयामुळे आणि कौटुंबिक इतिहासामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. 

Updated: May 26, 2023, 05:34 PM IST
Health Tips : तुम्हालाही 'या' वाईट सवयी असतील, तर शुगर वाढलीच समजा!  title=
Diabetes Symptoms and causes

Diabetes Symptoms and causes in Marathi: आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील बदलही अनेक आजाराच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात. तुम्ही काय खाता आणि कोणत्या प्रकारची जीवनशैली जगता याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तुमच्या रोजच्या आहारातील छोट्या सवयींमुळे तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात, तुम्हाला माहिती आहे का? तसेच आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण सगळेच रोज अशा अनेक गोष्टी चुकून किंवा जाणूनबुजून करत असतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. ज्या लोकांना आधीच मधुमेह आहे, विशेषत: त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा रक्तातील साखर कधीच वाढणार नाही.

रोज दही खाणे

दही हे प्रोबायोटिक अन्न आहे. आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. पण आयुर्वेदानुसार रोज दह्याचे सेवन करु नये. कारण जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढते आणि चयापचय बिघडू शकतो. तसेच तुम्हाला जळजळ होऊ शकते.

जड अन्न

सध्या असे बरेच लोक आहेत जे खूप उशीरा जेवण करतात. पण यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतील. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासांचे अंतर असावे. जर तुम्ही रात्री कडक अन्न खाल्ले तर यकृतावरील भार वाढतो. तसेच चयापचय खूप मंद होत असल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

जास्त खाणे

सध्या असे बरेच लोक आहेत की, जेवणाच्या ताटात जास्त अन्न ठेवतात. ज्यावेळी तुम्ही भुकेपेक्षा जास्त प्रमाणात खातात. त्यावेळी तुम्हाला लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

भुक नसताना खाणे

जर तुम्ही तुमच्या शरीरातील लक्षणांकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहींना तणावात असताना भूक लागत नाही. अनेकजण भरपूर अन्न खातात. म्हणूनच, आरोग्य तज्ञांच्या मतानुसार, भूक नसताना जबरदस्तीने खाऊ नये. 

जर तुम्हाला आधीपासून मधुमेह किंवा मधुमेहाच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर या सवयी सुधारणे खूप गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला मधुमेहामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता, चयापचय आणि पोषण यांसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)