जेवणानंतर दात कोरत असाल तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान!

दात कोरण्यासाठी करा या घरगुती पद्धतींचा वापर 

Updated: Sep 16, 2022, 11:43 PM IST
जेवणानंतर दात कोरत असाल तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान! title=

Toothpick : अनेकांना जेवणानंतर दात कोरण्याची सवय असते. दात कोरण्यासाठी मॅचस्टिक किंवा टूथपिकचा वापर करतात. त्यामुळे दातात अडकलेले बारिक कण निघून जातात मात्र, टूथपिकचा वापर करून दात कोरण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. दाताला (Teeth) आणि हिरड्यांवर (Gums) याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. (Putting a Toothpick in the Teeth After Eating Will be Harmful)

टूथपिकचा वापर हिरड्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. एवढंच नाही तर दात देखील कमकुवत होऊ शकतात. त्याचबरोबर दातांमध्ये गॅप पडण्याची देखील शक्यता असते. दात कोरल्यानंतर दातातून रक्त येण्याची समस्या देखील उद्भवू शकते. त्यासोबतच दातांच्या मुळांना देखील इजा पोहोचण्याची दाट शक्यता असते. दातांची चमक देखील कमी होते.

दात साफ करण्याचे हे सोपे मार्ग-
दात साफ करण्यासाठी कडुलिंबाची काडी लाभदायक ठरू शकते. टूथपिक प्रमाणे ही काडी कठोर नसल्याने हिरड्यांना संसर्ग होण्याची भीती कमी असते. कडुलिंबाची काडी एंटीबैक्टीरियल असते, त्यामुळे त्याचा उपयोग दात साफ करण्यासाठी केला जातो. याचा काही साईड इफेक्टही होत नाही.

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने दात साफ राहण्यास मदत होते. कोमट पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाला दुर्गंधी येत नाही. त्याचबरोबर माऊथवॉशने देखील तोंड स्वच्छ केलं जाऊ शकतं. जेवण केल्यानंतर जर अन्न दातात अडकलं असेल तर काही वेळाने दात घासणं देखील फायद्याचं ठरू शकतं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)