Health Tips In Marathi: वय वाढत असताना आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. वृद्धत्वाच्या खुणाही चेहऱ्यावर दिसू लागतात. काहीजण या खुण्या लपवण्यासाठी वेगवेगळी क्रिम किंवा औषधांचा वापर करतात. मात्र, या कृत्रिम गोष्टींचा आधार घेण्यापेक्षा नैसर्गिकरित्याच तुम्ही वृद्धत्वाच्या खुणा मिटवू शकतात. आजची बिघडलेली लाइफस्टाइल याचा परिणाम शरीरावर होताना दिसतो आहे. त्यामुळं तरुणपणातच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. तरुणपणातच म्हतारपण रोखण्यासाठी काही चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात. या सवयींवर मात केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.
माणसाच्या चुकीच्या सवयी याच त्याच्या मोठ्या शत्रू असतात. यामुळंच आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत असतो. या सवयींमध्ये वेळीच बदल केला गेला तर तुम्ही दिर्घायुष्यी तर व्हालच पण आरोग्याच्या छोट्या छोट्या कुरबुरीही कमी होतील. आजकाल कामाच्या गडबडीत जेवणाचे, झोपेचे गणित बिघडले आहे. त्यामुळं त्याचा परिणाम नकळतपणे शरीरावर होतो आहे. पण काम कोणी टाळू शकत नाही. पण काही वाईट सवयींवर मात करुनही तुम्ही बिघडलेले रुटिन सांभाळून तुमचं आरोग्य जपू शकता. फक्त या ६ सवयी बदलल्या पाहिजेत.
आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. मोबाइल आणि लॅपटॉप याच्या वापराशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही.ऑफिसच्या कामासाठीही आता लॅपटॉप हवाच. पण तुम्हाला माहितीये या लॅपटॉप आणि मोबाईलच्या अतिवापरामुळं त्याचा वयावर थेट परिणाम होतो. त्यामुळं तुमच्या सवयीत थोडा बदल करणे गरजेचे आहे. फक्त कामासाठीच तुम्ही फोन किंवा लॅपटॉपचा वापर करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही अपुरी झोप घेता तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळं तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं नेहमी पुरेशी झोप घ्या. एका व्यक्तीला कमीत कमी 6 ते 8 तासांपर्यंत झोप घ्यायला हवी.
जर तुम्ही मसालेदार किंवा तळलेले पदार्थ जास्त खात असाल तर ही सवय तुम्हाला खूप घातक ठरु शकते. यामुळं तुमचे वजन, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या तक्रारी वाढू शकतात.
जर तु्म्हाला सिगारेट, विडी, गांजा- दारू यांचे व्यसन असेल तर आत्ताच सावध व्हा. कारण तुमची ही सवय तुम्हालाच नुकसान पोहोचवेल.
जर तुम्ही एकाच जागी तास् न तास बसून काम करत असाल तर तुमची ही सवय थोडी बदला. यामुळं तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होती. कामातून थोडा ब्रेक घेऊन शरीराची हालचाल केली पाहिजे. जेणेकरुन शरीर अॅक्टिव्ह राहिल. एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहणे शरीरासाठी चांगले नाहीये.
तुम्हाला जेवणात भरपूर मीठ खाण्याची सवय असेल तर आत्ताच सावध व्हा. कारण जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचे ब्लड प्रेशर वर-खाली होऊ शकते. ब्लड प्रेशर वाढल्याने अनेक आजार तुम्हाला ग्रासू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)