मूगडाळ 'या' लोकांनी चुकूनही खावू नये; आरोग्यावर होतील विपरीत परिणाम

Side Effects Of Moong Dal: मूग डाळीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. मात्र, या लोकांनी रोजच्या आहारात मूगडाळीचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 20, 2023, 10:16 AM IST
मूगडाळ 'या' लोकांनी चुकूनही खावू नये; आरोग्यावर होतील विपरीत परिणाम title=
health tips in marathi these people should avoid eating moong daal it affect your health negatively

Side Effects Of Moong Dal: डाळी या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. डाळीत असलेल्या पौष्टिक गुणधर्मामुळं रोजच्या आहारात डाळींचा समावेश करणे फायद्याचे ठरते. मूग डाळही आरोग्यासाठी सुपरफुड आहे. मूग डाळीचे अनेक फायदे आहेत. रोज नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स: मूग डाळीमध्ये असतात. मात्र, काही जणांसाठी मूग डाळीचे सेवन खूपच हानिकारक मानले जाते. मूग डाळ कोणी खावू नये हे जाणून घेणे पण महत्त्वाचे आहे. 

या लोकांनी खाऊ नये मूग डाळ

लो ब्लड शुगर

लो ब्लड शुगरची समस्या असल्यास मूग डाळ खाणे हानिकारक ठरू शकते. असे काही घटक मूग डाळीत आढळतात. जे रक्तातील साखर कमी करण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत रक्तातील कमी साखरेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी त्याचे सेवन टाळावे.

लो ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी मूग डाळ खाणे खूप फायदेशीर आहे, परंतु जर तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या असेल, तर मूग डाळ खाणे टाळावे. त्याचे सेवन आपल्यासाठी हानिकारक असू शकते.

हाय यूरिक एसिड

शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढल्यावर मूग डाळ खाणे टाळावे. मूग डाळमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते. त्यामुळे जास्त यूरिक अॅसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी मूग डाळ खाणे टाळावे.

मुतखडा

किडनी स्टोनच्या समस्येमध्ये आहाराची काळजी न घेतल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात. मूगाच्या डाळीचे जास्त सेवन करणे किडनी स्टोनमध्ये अत्यंत हानिकारक मानले जाते. यामध्ये प्रथिने आणि ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)