Health: पायात मुंग्या आल्यास करू नका दुर्लक्ष, ‘या’ गंभीर आजारांचा धोका!

Numbeness and Tingling Feeling in Hand and Feet : पायामध्ये सतत मुंग्या येण्याचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्या तरी त्रासाचं लक्षण असण्याची शक्यता आहे. पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर त्यासाठी ही ५ कारणे जबाबदार ठरतात. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 19, 2023, 01:31 PM IST
Health: पायात मुंग्या आल्यास करू नका दुर्लक्ष, ‘या’ गंभीर आजारांचा धोका! title=

Numbeness and Tingling Feeling in Hand and Feet : सतत बसून बसून तुम्हालाही अनेकदा पायात मुंग्या आल्याचं जाणवलं असेल. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर ही समस्या जाणवू लागते. मात्र तुम्हाला हा त्रास सातत्याने जाणवत असेल तर सावधान व्हा. 

पायामध्ये सतत मुंग्या येण्याचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्या तरी त्रासाचं लक्षण असण्याची शक्यता आहे. पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर त्यासाठी ही ५ कारणे जबाबदार ठरतात. जाणून घेऊया ही कारण कोणती आहे.  (know the reason behind trickling in body parts)

Carpal tunnel syndrome

खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने Carpal tunnel syndrome चा त्रास दूर होण्यास मदत होईल.

व्हिटॅमिनची कमतरता

जर तुमच्या हात व पाय दोघांना ही मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे. तसंच त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा आळसवाणे वाटेल.

मधुमेह

रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हायपरथायरॉईसम

थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य 

मानेची नस आखडणे

मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)