स्ट्रेस दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स, परिणाम काही दिवसातच दिसेल

जर तुम्ही देखील स्ट्रेस किंवा तणावाने त्रस्त असाल आणि ते कमी करू इच्छित असाल तर तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.

Updated: Sep 29, 2021, 04:12 PM IST
स्ट्रेस दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स, परिणाम काही दिवसातच दिसेल title=

मुंबई : आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे स्वत:साठी खास वेळ काढू शकत नाही. दिवसभर काम केल्यानंतर माणसाला थकवा जाणवतो, तसेच कामाशी संबंधित तणावामुळे, लोक सहसा त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाला व्यवस्थीत मॅनेज करु शकत नाहीत. मग सगळा तमाव दुर करण्यासाठी आपण सोशळ मीडियाकडे वळतो किंवा कोणतीही आवडती वेबसीरिज पाहण्यात वेळ घालवतो. ज्यामुळे थोड्यावेळासाठी का होईना आपण आपला सगळा तणाव विसरतो.

यासगळ्यामुळे सर्व आपला तणाव दूर होत नाही, परंतु त्याला आपण काही काळासाठी विसरतो किंवा दूर होते. परंतु तणाव दूर करण्यासाठी आपण कोणताही मार्ग अवलंबत नाही किंवा त्यावरती काही सोल्यूशन आणत नाही आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ दिसून येतो. कारण येणाऱ्या काळात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

जर तुम्ही देखील स्ट्रेस किंवा तणावाने त्रस्त असाल आणि ते कमी करू इच्छित असाल तर तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.

ध्यान करा

ताण टाळण्यासाठी, दररोज 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. तुम्ही अशा ठिकाणी ध्यान करावे जेथे शांतता असावी. हे नियमितपणे केल्याने तुम्ही तणावमुक्त राहाल. या व्यतिरिक्त, ताण आणि चिंताची पातळी कमी होते.

एरोमेटिक डिफ्यूजर वापरा

हे आपला मूड सुधारते आणि तणाव कमी करण्यास मदत करते. अरोमाथेरपी तुमच्या मेंदूच्या लिबिक सिस्टीमची भावना आणि स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे तुमचे तणाव दुर होईल.

जर्नल ठेवा

आपले अनुभव, भीती आणि कल्पनांबद्दल दररोज लिहा. ही थेरपी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. असे केल्याने, आपण स्वतःला त्या सर्व गोष्टींशी जोडण्यास सक्षम व्हाल ज्या आपण मागे सोडल्या आहेत किंवा दूर गेल्या आहेत. तसेच आपले मन व्यक्त केल्याने देखील माणसाला खूप चांगले वाटते आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

श्वास घेण्याचे व्यायाम करा

ताण आणि तणाव दूर करण्यासाठी दररोज थोडा वेळ प्राणायाम करा. हा व्यायाम नियमितपणे केल्याने तुम्हाला आराम वाटेल. हे दररोज केल्याने तुमचे चयापचय सुधारते. तसेच तुमचा तुमच्या रागावर कंट्रोल राहील.

पुरेशी झोप घ्या

दररोज वेळेवर झोपा आणि सकाळी फिरायला जा. तुमच्या दैनंदिन दिनक्रमात या गोष्टी केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल दिसतील. झोपेच्या 3 ते 4 तास आधी मोबाईल, आयफोन आणि टीव्ही वापरणे बंद करा.