Health Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या

Breakfast : अनेकदा असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखं असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 28, 2023, 05:06 PM IST
Health Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या title=
breakfast be Cold or hot

Health tips in Marathi:  ट्रेन, ऑफिसमध्ये पाहिले असेल तर अनेक लोक खूप सुस्त दिसतात.  तर त्यापैकी बरेच जण सकाळी काहीही न खाता घराबाहेर पडलेले असतात. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, मळमळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण रोज सकाळचा नाश्ता करुन जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.  चला जाणून घेऊया सकाळच्या नाश्त्यात कसा पाहिजे.... 

दिवसाचे पहिले जेवण पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असणे हे उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. चांगला नाश्ता शरीरासोबतच तुमचे मनही निरोगी ठेवते. चांगला ब्रेकफास्ट हा लठ्ठपणा कमी करण्यास, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाशी संबंधित आजारांची शक्यता कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही अगोदरच नियोजन केले पाहिजे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत नाश्ता चुकवू नये. तुमच्या आवडीनुसार फळे, हिरव्या भाज्या, नट, ओट्स, पोहे, उपमा, कॉर्न फ्लेक्स, अंडी अशा विविध पर्यायांमधून तुम्ही नाश्त्याचा पर्याय निवडू शकता. हा पदार्थ तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतो. पोषणतज्ञांच्या मते, दिवसाचा पहिला आहार कार्बोहायड्रेट आणि प्रथिने असावा.

वाचा: उन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

इडली सांबार आणि चटणी

इडली त्यासोबत भाज्या घालून केलेलं सांबार आणि चटणी हा दिवसाच्या सुरुवातीचा नाश्ता तुम्हाला सर्व घटक पुरवणारा आहे. सांबारमध्ये डाळी प्रथिने आणि मसाले घालून तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. चटणीमध्ये नारळ असते, ज्यामुळे तुम्हाला आवश्यक चरबी मिळते. हा नाश्ता परिपूर्ण आहे.

पनीर मटर पराठा आणि दही

गव्हाचे पराठे तुम्हाला दिवसभरासाठी 60% कार्ब देतात. चीज, मटार पासून प्रथिने. हे स्निग्धांश आणि जीवनसत्त्वे तुमच्या शरीराचे पोषण करतात. सकाळच्या नाश्तामुळे संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी तुम्हाला जास्त भूक लागणार नाही.

पालक, अंडी आणि ब्राऊन ब्रेड टोस्ट

जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही स्नॅक्ससाठी अंडी, काही हिरव्या भाज्या आणि ब्राऊन ब्रेड देखील घेऊ शकता. टोस्टमधून तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळतात, तर अंडी तुम्हाला प्रोटीन देतात. टोस्टर पसरेल पीनट बटर तुम्हाला प्रथिने आणि आवश्यक चरबी प्रदान करते. पालकामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. 

 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)