सावधान! रात्री उशिरा जेवण करताय? होतील 'हे' गंभीर आजार

रात्री उशिरा जेवण करत असाल तर वेळीच व्हा सावध!

Updated: Oct 2, 2022, 08:17 PM IST
सावधान! रात्री उशिरा जेवण करताय? होतील 'हे' गंभीर आजार title=

Health News : आपल्या खाण्याच्या सवयी आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. आपण काय खातो आणि केव्हा खातो, या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. धगधगच्या धावपळीच्या जीवनात (Busy Lifestyle) सकस आहार घेणं गरजेचं आहे (Health Tips). जॉबच्या वेळापत्रकामुळे अनेकजण जेवण वेळेवर करत नाहीत. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

रात्री उशिरा अनेकदा लोकं फास्ट फुड (Fast food) खाण्यावर भर देतात. फास्ट फुड खालल्याने अनेकदा पोट वाढणे आणि वजन वाढण्याचे प्रकार समोर येतात. लेट नाईट पार्टीमुळे अनेकदा उशिरा जेवण (Late Meal) होतं. रात्री जेवण झाल्यानंतर थोडं चालणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

रात्री उशिरा जेवल्याने होणाऱ्या समस्या-

अपचनाची समस्या -

रात्री उशिरा जेवण करण्याची सवय ही आरोग्यासाठी हानीकारक समजली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे समस्या जाणवू शकतात. रात्री उशिरा जेवण केल्या अपचनाची समस्या उद्भवू शकते (Indigestion problem). रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. तसेच छातीत जळजळ होते.

वजन वाढणे - 

रात्री उशिरा जेवण केल्याने कोलेस्ट्रोल वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. रात्री उशिरा जेवण केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज नियंत्रित होत नाही आणि त्यामुळे शरीराच्या चयापचयक्रियेची (metabolism) गती कमी होते आणि वजन वाढण्याची (weight gain) शक्यता वाढते.

झोप न येणे- 

जर तुम्ही ऑफिसमधून उशिरा निघत असाल आणि उशिरा जेवण करत असाल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या (Insomnia) उद्भवू शकते. त्याचबरोबर कमी झोप येण्याची सवय देखील लागू शकते. त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या (Stomach problems) जाणवू शकतात.

मधुमेहाचा धोका -

रात्री उशिरा जेवण केल्यानंतर पचनात होणाऱ्या समस्यांमुळे कोलेस्टेरॉल आणि इन्सुलिनची पातळी प्रभावित होते. त्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा (diabetes) आणि रक्तदाबाचा धोका वाढतो (high blood pressure). त्यामुळे वाढत्या वयानुसार त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.

Black Water : सेलिब्रिटी पीत असलेल्या काळ्या पाण्यामध्ये नक्की असतं तरी काय जाणून घ्या...

(Disclaimer : या बातमीत देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'झी 24 तास' याची पुष्टी करत नाही)