Black Water : सेलिब्रिटी पीत असलेल्या काळ्या पाण्यामध्ये नक्की असतं तरी काय जाणून घ्या...

आज आम्ही तुम्हाला Black Water विषयी सांगणार आहोत...

Updated: Oct 2, 2022, 07:55 PM IST
Black Water : सेलिब्रिटी पीत असलेल्या काळ्या पाण्यामध्ये नक्की असतं तरी काय जाणून घ्या... title=
Black Water Know what exactly is in the black water that celebrities drink nz

Black Water : सध्या Black Water हा लोकांच्या चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर (Social Media) ही अनेकांना Black Water चे वेगवेगळे मिम्स (Mims) करताना पाहिलं आहे. सेलिब्रिटी (celebrity) सुद्धा Black Water च्या बाटल्या घेऊन जीम मध्ये जाताना पाहिले जाते. 

मलायका अरोरा (Malaika Arora) ते रॅपर बादशाह (Rapper Badshah) यासारख्या मोठमोठ्या कलाकार Black Water च्या जाहिराती (Advertisements) करताना देखील दिसतात. मग नेमकं अशा वेळेस Black Water काय आहे, त्याचे महत्त्व काय आहेत आणि त्याची किंमत असे बरेचसे प्रश्न सामान्यांना पडतात आज आम्ही तुम्हाला Black Water विषयी सांगणार आहोत...(Black Water Know what exactly is in the black water that celebrities drink nz)

Black Water म्हणजे काय?
Black Water म्हणजे क्षारयुक्त पाणी. Black Water या पाण्यात सामान्य पाण्यापेक्षा जास्त खनिजे असतात. Black Water मध्ये 70-80 मिनरल्सचे प्रमाण आढळते. या पाण्याचा शरीराला हायड्रेट (Hydrate the body) ठेवण्यासोबतच इतर अनेक प्रकारे फायदे होतात. या पाण्यायातून तुमच्या शरीराला इलेक्ट्राइड्स मिळतात.

आणखी वाचा - Personality Test: तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य कपाळावरून जाणून घ्या , सिक्रेट माहिती आता आली समोर

Black Water चे महत्त्व ?

अल्काईन पाण्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. असे सांगितले जाते की, Black Water पाण्यामुळे तुम्ही निरोगी (healthy) राहता, तुमचे वजन (weight) आटोक्यात राहते आणि  तुमचा चेहरा तजेलदार राहतो. साध्या पाण्यापेक्षा Black Water मध्ये पीएच चे प्रमाण जास्त असते. साध्या पाण्यात क्षारचे प्रमाण कमी असते. 

Black Water ची किंमत?
अर्ध्या लीटर पाण्याच्या 6  बॉटल्स 550 ते 600 रुपयांना बाजारात मिळतात. म्हणजे Black Water ची 1 लीटर बॉटल 200 रुपयांना बाजारात मिळते. 

आणखी वाचा - Astro Tips: गुबगुबित गालाचे पुरुषांचं नशीब... पाहा सामुद्रिक शास्त्र काय सांगते?