High Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..

High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack)  तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.

Updated: Feb 15, 2023, 10:31 PM IST
High Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या.. title=
High cholesterol

High Cholesterol Symptoms:  बदलेल्या जीवनशैलीमुळे हाय कोलेस्ट्रॉलची (High cholesterol) समस्या हल्ली खूप सामन्य झालीये. हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी अजिबात चांगलं नाही. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनला गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) म्हणतात. हे कोलेस्ट्रॉल हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं. मात्र, अतिप्रमाण झाल्यास त्याचा तोटा  तुमच्या शरिरावर दिसून येतो. (health tips 4 warning signs symptoms of high cholesterol fat in arteries know causes treatment options marathi news)

कोलेस्ट्रॉल मुख्यत्वे तळलेल्या, फास्ट फूड (fast food) आणि इतर काही पदार्थांमधून आपल्या शरीरात येते. त्याचा थेट परिणाम शरिरावर जाणवतो. काही संकेत आहेत, ज्यामधून दिसून येतं की, तुमच्या शरिरातील धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल हल्ला (cholesterol badhane ke lakshan) झालाय. 

Cholesterol वाढल्याचे हे 4 संकेत- 

  • हात आणि पाय सुजणे (Swelling of hands and feet) 
    ज्यावेळी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढतं तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या हात आणि पायांवर दिसू लागतो. जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा हात-पायांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो. त्यामुळे नसांचा रंग देखील बदलतो आणि त्यामध्ये सूज आणि बधीरपणा येऊ लागतो. यामुळे खूप वेदनाही जाणवतात. त्याचबरोबर हात पायही कमकुवत होऊ लागतात.
     
  • त्वचेवरील पुरळ (Skin rash) 
    बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे  (Bad Cholesterol)  रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थ गोठू लागतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा अडथळे येतात. हे पुरळ शरीराच्या हाता पायावर तसेच अनेक भागात दिसून येतात. यामुळे तुमच्या डोळ्याखाली, पाठीवर, पायावर आणि तळहातावर उभार दिसू लागतात.
     
  • नखांवर परिणाम (Effects on nails) 
    सर्वात आधी लक्षात येणारं हे लक्षण आहे. जेव्हा रक्तामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल (Cholesterol) जमा होऊ लागतं, तेव्हा ते रक्तवाहिन्यांचा (blood vessels) विस्तार करते. त्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त पोहोचत नाही. शरीराचं अखेरचं टोक असलेलं नखांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नखांमध्ये काळ्या रेषा दिसून येतात. कधीकधी नखे फुटू लागतात. तसेच नखं पातळ आणि तपकिरी रंगाची दिसतात. 
     
  • डोळ्यांवर परिणाम (Effects on eyes)
    कोलेस्ट्रॉल वाढलं की डोळ्याभोवती पिवळे डाग (Yellow spots around the eyes) दिसू लागतात. बॅड कोलेस्ट्रॉल खूप वाढलं तर हे डाग नाकापर्यंत देखील पोहोचतात. याला Xantheplasma palpebrarum (XP) म्हणतात.

    आणखी वाचा - Lower cholesterol : शरीरातील Cholesterol कमी करतील किचनमधील 'या' गोष्टी!

Cholesterol म्हणजे काय असतं?

कोलेस्‍ट्रॉल म्‍हणजे चरबीसारखा एक पदार्थ असतो जो आपल्या शरीरातील फॅट्स वाढवतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात गुड कोलेस्टेरॉल (Good Cholesterol) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात बॅड कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) असे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत.