Avoid Skiping Breakfast: ब्रेकफास्ट (breakfast) हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आदल्या दिवशी आपण रात्री जेवतो आणि शतपावली केल्यानंतर आपण झोपी जातो त्यातून सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला जोरदार भुक लागते. ही सणसणीत भूक (hunger) अगदी साहजिकच आहे कारण सात ते आठ तास आपलं पोट हे रिकामं असतं. ही भुक लागणं अगदी नैसर्गिक आहे यावरूनच तुम्हाला लक्षात येते की आपल्याला सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्ट आपण काय आणि कसा केला पाहिजे. मुख्यत्वे आपण आपल्या न्याहारीत चविष्ट आणि हेल्थी (healthy breakfast) गोष्टींचा वापर करतो. ब्रेकफास्ट हा पोटभर असणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्यालाही आपल्या दिवसाची आणि कामाची सुरूवात करण्यासाठी ब्रेकफास्टची गरज असते आणि तोही आरोग्यदायी आणि पोटभर. (health news stop skiping your breakfast in the morning otherwise you will have bad impacts)
ब्रेकफास्टचे हे मुख्य फायदे असले तरी अनेकजण ब्रेकफास्ट न करताच आपल्या दिवसाची सुरूवात करतात. पोटभरून आणि हेल्थी ब्रेकफास्ट करणं आवश्यक आहे हे त्यांना माहिती असूनही लोकं याकडे दुर्लक्ष करतात. आजकाल सगळ्यांच्याच प्रायोरिटीज बदल्या आहेत. अनेक जणांच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे (lifestyle) सगळेच जण आपल्याला गोष्टींना वेगळ्या पद्धतीनं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कामाच्या तणावामुळे लोकं उशीरा तर जेवत आहेतच परंतु त्यातून ते आपल्या आरोग्याकडेही लक्ष न देता सकाळचा ब्रेकफास्टही करत नाहीयेत. तुम्हाला माहितीये का की ब्रेकफास्ट स्किप केल्यानं तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतात.
न्याहारी हे आपल्या आहारातील सर्वात महत्वाचे जेवण आहे. जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकतात. असं म्हटलं जातं की नाश्ता न केल्याने तुमचे हृदय चांगल्या प्रकारे काम करत नाही. ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या देखील असू शकतात. याशिवाय तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या देखील असू शकतात. नाश्ता न करण्याचे काय तोटे आहेत?
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)