एक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल...

Tea Good Or Bad : भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का अति चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते?

राजीव कासले | Updated: Oct 2, 2024, 08:40 PM IST
एक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल... title=

Tea Good Or Bad : भारतातील प्रत्येक दहा व्यक्तींपैकी नऊजण हे चहाप्रेमी आहेत. भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण अति चहा पिण्याने आरोग्यावर वाईट परिणाम (Tea Side Effects) होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, एक महिना चहा न प्यायल्यास तुमच्या शरीरात काय बदल पाहायला मिळतील. (Benefits Of Giving Up Tea For A Month)

रक्तदाब नियंत्रणात राहील

चहा प्यायल्यानंतर थकलेल्या शरीराला काही प्रमाणात उर्जा मिळते. चहामुळे फुर्ती येत असल्याचं बऱ्याच लोकांना वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का चहामुळे मिळणारी ही उर्जा पुढे अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरते. चहामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे शरीरातील रक्तदाब वाढतो. अती चहा प्यायल्याने उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. हे टाळण्यासाठी एक महिना चहा पिणं बंद करा. सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला थोडसं सुस्त आणि थकवा जाणवेल, पण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल.

दात चमकदार राहातात

तुम्हाला माहित आहे का, तुमचा आवडता चहा तुमच्या दातांवरही परिणाम करत असतो? हे खरं आहे. चहामध्ये असलेलं ऍसिड आपल्या दातांचं इनॅमल कमकुवत करते. त्यामुळे पिवळेपणा, डाग आणि दातांची संवेदनशीलता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. महिनाभर चहाचं सेवन बंद केल्याने तुमच्या दातांचा रंग हळूहळू नैसर्गिकरित्या चमकू लागेल आणि दात किडण्यापासूनही रोखता येतील.

वजन नियंत्रणात राहातं

अती चहा पिण्याचा वजनावरही वाईट परिणाम होतो. चहा आणि कॉफीमध्ये असलेली साखर आणि कॅफिन वजन कमी करण्यात अडथळा आणतात आणि चयापचयवर देखील वाईट परिणाम करतात. जर तुम्ही नियमित चहापासून महिनाभर दूर राहिल्यास वजन कमी करण्यात फायदा दिसू शकतो

शांत झोप लागते

दिवसभरातल्या थकव्यानंतरही रात्री शांत झोप येत नसेल तर यामागेही चहाचा छंद जबाबदार ठरू शकतो. एक महिना चहा पूर्णपणे बंद करा, तुम्हाल याचे चांगले परिणाम जाणवू लागतील. रात्री शांत झोप तर लागेलच शिवाय सकाळी उठल्यानंतरही ताजंतवाणं वाटेल. कॅफिन सोडल्याने तुमची झोप तर पूर्ण होईलच पण चिंता आणि तणावही कमी होण्यास मदत होईल.

मधूमेहावर नियंत्रण मिळवता येईल

चहात वापरल्या जाणाऱ्या साखरेमुळे शरीरातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. एक महिना चहाचं सेवन करणं बंद केल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते. कॅफिन रक्तातील साखरेची पातळी आणि त्याच्याशी संबंधित समस्या देखील वाढवते.

(Disclaimer: लेखात दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे आणि त्याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. आपल्याला काही प्रश्न किंवा आजार असल्यास, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)