health news: शरीरात हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवायचं आहे तर खा 'हे' पदार्थ

रक्ताच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, अशक्तपणा-थकवा, छातीत दुखणे, निद्रानाश, धाप लागणे किंवा चक्कर येणे अशा समस्या उद्भवू लागतात. गर्भवती महिलेला रक्तक्षय असल्यास, मूल अपंग किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकते

Updated: Dec 24, 2022, 08:27 AM IST
health news: शरीरात हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवायचं आहे तर खा 'हे' पदार्थ  title=

Hemoglobin level increse : शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होते. त्यामुळे थकवा वाढतो. एनिमियाची समस्याही होऊ शकते. त्यामुळे या सर्व समस्यांपासून वाचवण्यासाठी हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे. थॅलेसेमिया (thalassaemia) किंवा हिमोफिलियासारख्या (Haemophilia) अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या आजारांमध्ये अॅनिमियाचा समावेश होतो. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास ती व्यक्ती कोमात जाते. त्याचबरोबर रक्ताच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, अशक्तपणा-थकवा, छातीत दुखणे, निद्रानाश, धाप लागणे किंवा चक्कर येणे अशा समस्या उद्भवू लागतात. गर्भवती महिलेला रक्तक्षय असल्यास, मूल अपंग किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कशा आणि कोणत्या गोष्टी खाल्ल्याने अशक्तपणावर सहज मात करता येते. (How to increse hemoglobin level)

व्हिटॅमिन सी (VITAMIN C)

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात संत्रे, लिंबू, किवी, पेरुचा समावेश लाभदायक ठरु शकतो.

फॉलिक ऍसिड (FOLIC ACID)

शरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता झाल्यास, हिमोग्लोबिनची लेवलही कमी होऊ लागते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन लेवल उत्तम राखण्यासाठी फॉलिक ऍसिडचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. डाळ, कोबी, ब्रोकली, बदाम, मटार, केळी आहारात सामिल करु शकता.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स (VITAMIN B COMPLEX)

रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता मनुके भरुन काढण्यास मदत करतात. लोहयुक्त काळे मनुके खाल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. 

डाळिंब (POMEGRANTE)

डाळिंबामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सीसह लोहदेखील चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे डाळिंबामुळेही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या (GREEN VEGETABLES)

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीशिवाय, हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर आहे.

बदाम (ALMONDS)

10 ग्रॅम ड्राय रोस्टेट बदाममध्ये 0.5 मिलीग्रॅम लोह असतं. त्याशिवाय बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमही असतं. बदामाच्या सेवनानेही हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करण्यास मदत होऊ शकते.(almonds increse hemoglobin level)

हा आहार शक्यतो टाळा 

असाही आहार असतो जो लोह नष्ट करतो किंवा ब्लॉक करु शकतो. लोह आणि कॅल्शियम असा एकत्रित आहारही घेऊ नये. त्याशिवाय चहा, कॉफी, सोडा, वाईन, बीयर या गोष्टीही नियंत्रणात राखणं अत्यावश्यक आहे.

गाजर, केळी आणि पेरू 

गाजराचा रस रोज पिऊन आणि गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होऊ शकते. पिकलेले पेरू खाल्ल्यानेही हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही. यासोबतच केळीमध्ये भरपूर प्रथिने, लोह आणि खनिजे देखील आढळतात, त्यामुळे रक्तात वाढ होते.

सफरचंद, द्राक्षे आणि संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. रक्त वाढवण्यासोबतच रक्त शुद्ध करण्याचेही काम करते. याच द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह मुबलक प्रमाणात असते आणि द्राक्षे आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. यासोबतच सफरचंद खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल. त्यामुळे सफरचंदातील हिमोग्लोबिनचे प्रमाण लवकर वाढते.