Health news : मातृत्त्वं महिलेला नव्यानं आयुष्य अनुभवण्याची संधी देत असतं. अशा या मातृत्त्वाची चाहूल लागते तेव्हा आयुष्य 360 अंशांनी बदलून जातं. पण, हल्लीच्या धकाधकीच्या आणि अतिघाईच्या काळामध्ये अनेक महिलांना बदलच्या जीवनशैलीमुळं मोठा फटका बसतो आणि त्यांच्या गर्भधारणेत अडचणी येतात. खाण्यामध्ये होणारी भेसळ, नकळत चुकणाऱ्या खाण्याच्या वेळा, व्यायामाचा अभाव, कामाचे दीर्घकाळ चालणारे तास... या आणि अशा अनेक गोष्टी गर्भधारणेच्या प्रक्रियेवर परिणाम करताना दिसतात.
गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणी किंवा योग्य वेळेत गर्भधारणा व्हावी या हेतूनं महिलांना घरातील काही मोठ्यांकडून सल्ले देण्यात येतात. तू हेच खा, ते नको खाऊस वगैरे वगैरे. या न संपण्याऱ्या सल्ल्यांपैकी एक म्हणजे बीट हे कंदमूळ खाण्याचा. बीटच्या सेवनामुळं गर्भधारणेच्या शक्यता वाढतात असं म्हटलं जातं.
आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बीटच्या रसात नायट्रेट असतं. जे शरीरात नायट्रीक ऑक्साईडमध्ये रुपांतरित होत रक्तवाहिन्यांनाना रुंद करतो आणि यामुळं रक्तप्रवाह सुरळीत राहतो. बीटच्या सेवनामुळं प्रजननासाठी महत्वाच्या अवयवांपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत राहतो आणि वाढतो.
अनेकदा शरीरात असणारे काही घटक प्रजनन क्षमतेमध्ये अडचणी निर्माण करतात. अशा वेळी बीटचा रस मोठी मदत करतो. या कंदमुळामध्ये असणाऱ्या लोह आणि फोलिक अॅसिड अशा घटकांमुळं गर्भपाताचीही शक्यता कमी होते. बीटमध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी9 असतात. ज्यामुळं पुरुषांनाही बीटचा फायदा होतो. यामध्ये असणारा बीटालेंस घटक एक अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतो आणि अंडाशयाचं आरोग्य, कार्यक्षमता सुरळीत ठेवतो. ज्यामुळं महिलांना गर्भधारणेमध्ये बीटच्या सेवनाचा फायदा होतो असं म्हणतात.
जे व्यक्ती लाल बीटालेनचं पचन करू शकत नाहीत त्यांना बीटच्या सेवनामुळं लाल रंगाची लघुशंका येण्याची शक्यता आहे. अनेकांनाच बीट सहजपणे पचवता येत नाही अशा मंडळींना बीटच्या सेवनानंतर शरीर जड वाटणं, त्वचेवर डाग उठणं, खोकला आणि घाबरल्यासारखं होणं अशा समस्या सतावू शकतात. त्यामुळं वरील कोणताही त्रास असल्यास बीटचं अतीसेवन टाळावं.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, आहारविषयक बदलापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)