पायाला मुंग्या येत असतील तर समजून जा, तुम्हाला....

तुम्हालाही हाता-पायाला येताता मुंग्या, ही बातमी खास तुमच्यासाठी...

Updated: Oct 18, 2022, 07:36 PM IST
पायाला मुंग्या येत असतील तर समजून जा, तुम्हाला.... title=

Sensation In Legs : तुम्हाला काहीवेळा पायाला इतक्या मुंग्या येतात की संपूर्ण पाय बधिर होतो. जेवताना मांडी घातल्यावर किंवा कामावर असताना खुर्चीवर बसलेलं असताना पायाला मुंग्या येतात. त्यावेळी पाय सरळ करून ठेवावा लागतो, त्यानंतर काही वेळाने पाय पुन्हा जागेवर येतो. तुम्हाला सारख्याच जर पायाला मुंग्या येत असतील तर तुमच्यामध्ये जीवनसत्वाची कमी आहे.  (sensation tingling in legs and hands vitamin e deficiency symptoms)

तुमच्या हाता पायांना मुंग्या येत असतील तर त्याचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची कमतरत आहे. व्हिटॅमिन ई पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे नुकसान होण्यापासून वाचवतं. व्हिटॅमिन ई हे सूर्याच्या किरणांमधून तुम्हाला मिळू शकतं. त्यासोबतच तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढली तरीही तुम्हाला मुंग्या येऊ शकतात. मुंग्या येणे हे मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. पायाच्या तळव्यापासून सुरू होतात आणि हळहळू संपूर्ण पायाला मुंग्या येऊ लागतात.

व्हिटॅमिन ई ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. यासाठी व्हिटॅमिन ई असलेल्या अन्नाचा आहारात समावेश करा. बदामामध्ये व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात आढळते. तुम्ही रोज सकाळी ते खाऊ शकता. सूर्यफूल तेलामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे तेल तुम्ही सॅलडमध्ये घालून खाऊ शकता. शेंगदाणे आणि एवोकॅडो हे देखील समृद्ध जीवनसत्व ईसाठी अन्न आहेत. मुंग्या येणे दूर करण्यासाठी तुम्ही ते खाऊ शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)