Skin tips for Diwali 2022 : घरच्याघरी करा 'हे' काम, दिवाळीमध्ये पैसेही वाचतील आणि मिळेल ग्लोईंग स्किन

दिवाळीमध्ये त्वचा दिव्यांसारखी उजळेल लख्ख... घरच्याघरी असं करा वॅक्सिंग...

Updated: Oct 18, 2022, 06:04 PM IST
Skin tips for Diwali 2022 : घरच्याघरी करा 'हे' काम, दिवाळीमध्ये पैसेही वाचतील आणि मिळेल ग्लोईंग स्किन title=

Skin tips for Diwali 2022 : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात प्रत्येकाला दिवाळीत सर्वांमध्ये उठून दिसायचं असतं. विशेषतः मुलींना आपली स्किन नितळ (Glowing Skin)  असावी असं वाटतं. अशात महिलांमध्ये स्पा किंवा ब्युटी पार्लरमध्ये ( Spa And Beauty Parlor) जाण्याची लगबग देखील असेल. मात्र या बातमीच्या माध्यमातून तुमचे काही पैसे तर वाचू शकतातच. सोबतच कदाचित तुम्ही ही गोष्ट यानंतर स्वतःची स्वतः करायला लागाल. या बातमीच्या माध्यमातून तुम्ही घरच्याघरी कसं वॅक्सिंग ( Waxing Tips) करू शकतात, वॅक्सिंग करताना कोणत्या स्टेप्स लक्षात ठेवायला हव्यात. या सर्व गोष्टींबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात घरच्याघरी वॅक्सिंग करायची योग्य पद्धत. सध्या जवळजवळ प्रत्येक महिला आणि काही पुरुषही शरीरावरील केसांपासून सुटका मिळवण्यासाठी वॅक्सिंगचा पर्याय अवलंबतात. मात्र वॅक्सिंग करताना  बऱ्याचदा काही चुका होतात ज्यामुळे महिलांना प्रचंड त्रास देखील होतो ( How to avoid mistakes during waxing) . अशात घरच्याघरी कशा प्रकारे वॅक्सिंग करावं याबाबतच्या टिप्स जाणून घेऊयात.    

वॅक्सिंग करण्याआधी घ्यायची काळजी:  

  • तुम्हाला शरीराच्या ज्या भागावर वॅक्सिंग करायचं आहे त्या भागावरील केस आधी ट्रिम ( Trim hair) करून घ्या. यामुळे वॅक्स व्यवस्थित केसांवर चिटकण्यास मदत होईल. 
  • वॅक्सिंग करण्याआधी त्वचेला तयार करणं आहे गरजेचं याला त्वचेला एक्सफॉलिएट करणं असं म्हणतात. यासाठी तुम्ही शुगर स्क्रब वापरू शकतात. साखर आणि ऑलिव्ह ऑइल ( Sugar and Olive Oil Scrub) एकत्र करून तुम्ही हे नॅचरल स्क्रब तयार करू शकतात. त्यानंतर त्वचेवर गोलाकार आकाराने स्क्रब करा. स्क्रब झाल्यानंतर त्वचेला सहन होईल एवढ्या गरम पाण्याने त्वचा धुवून घ्या. 

वॅक्सिंग करताना 'या' पाच गोष्टींची घ्या काळजी: 

  1. वॅक्सिंगआधी त्वचेला त्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. म्हणूनच त्वचेला एक्सफॉलिएट करा. 
  2. अतिशय जास्त वॅक्सचा वापर करू नका. वॅक्सची कन्सिस्टन्सी (Check Consistancy of Wax) अतिशय घट्टही नसावी. 
  3. वॅक्स पूर्णपणे सुकण्याआधी काढू नका. अशाने त्वचेला जळजळ होऊ शकते. 
  4. एका भागावर महिन्यात एकपेक्षा जास्तवेळेस वॅक्सिंग करू नका.
  5. वॅक्स जास्त गरम करू नका, वॅक्सिंग करायच्याआधी वॅक्स किती गरम आहे ते चेक करा. वॅक्स तुमच्या रूम टेम्परेचरवर असावं

वॅक्सिंग करताना या चुका पडतील महागात

  • तुम्हला सनबर्न ( Sunburn) झालं असल्यास किंवा तुमची त्वचा सेन्सिटिव्ह (Sesetive Skin) असल्यास वॅक्सिंग करू नका.
  • तुम्ही प्रेग्नन्ट असाल किंवा स्तनपान ( Avoid waxing during pregnancy or breastfeeding) करणाऱ्या माता असाल तर वॅक्सिंग टाळा 
  • जखमेवर चुकूनही वॅक्सिंग करू नका 
  • मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणे टाळा 

घराच्या घरी कसं कराल वॅक्सिंग? 

  • तुम्ही घराच्याघरी वॅक्सिंग करू शकतात. मात्र सावधानता बाळगली नाही तर तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. चुकीच्या पद्धतीने वॅक्सिंग केल्यास त्वचेवर चट्टे येणं, त्वचेची जळजळ होऊ शकते. 
  • वॅक्सिंगच्याआधी त्वचा स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. 
  • वॅक्स गरम झाल्यानंतर हिटरमधून काढून केस वाढण्याच्या दिशेने लावावं. यासाठी तुम्ही वॅक्स ऍप्लिकेटरचा ( Use Wax Applicator)   वापर करू शकतात. 
  • ज्या भागावर तुम्हाला वॅक्सिंग करायची आहे तिथे वॅक्सची पातळ परत चढवा
  • एकदा वॅक्स लावल्यावर त्यांनतर एक एक वॅक्स स्ट्रीप घेऊन ज्या भागावर वॅक्सिंग करत आहात त्यावर रगडून घ्या. जमुळे वॅक्स त्याला चिटकण्यास मदत होईल. वॅक्स सुकल्यावर ज्या भागाने केसाची ग्रोथ होते आहे त्या दिशेने खेचून काढा. वॅक्स स्ट्रीप ( Wax Strips ) काढताना जास्त जोर लावू नका. 
  • जास्त दुखू नये म्हणून वॅक्सिंग केलेल्या भागात हाताने दाबून धरा.
  • वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर ऍलर्जी किंवा इन्फेक्शन ( Waxing and side effects)  होऊ नये म्हणून क्रीम किंवा बॉडी लोशनने मसाज करा. एलोव्हेरा जेलने मसाज केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. सामान्य जीवनात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.