शरीरात ही लक्षणे दिसल्यास कॅल्शियम कमी असल्याचा इशारा, चुकूनही दुर्लक्ष करु नका

 शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची (Calcium Deficiency) चिन्हे ओळखणे महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही अनेक गंभीर समस्यांना बळी पडू शकता.

Updated: Jan 13, 2022, 08:55 AM IST
शरीरात ही लक्षणे दिसल्यास कॅल्शियम कमी असल्याचा इशारा, चुकूनही दुर्लक्ष करु नका title=

मुंबई : Calcium : शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे (Calcium Deficiency) तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. यामुळे मुलांमध्ये मुडदूस आणि प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, यासाठी शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू नये, यासाठी तुम्ही आहाराची काळजी घेणे आणि काही लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. 

जर तुम्हाला सतत दातांसंबंधी समस्या येत असतील, थकवा जाणवत असेल, त्वचा कोरडी होत असेल आणि स्नायूत पेटके  येत असतील तर ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत, हे तात्काळ ओळख पटविण्यास मदत करतात.

या संकेताने ओळखा कॅल्शियम कमी आहे!

जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा या स्थितीला हायपोकॅल्सेमिया म्हणतात. हायपोकॅल्सेमिया म्हणजे रक्तात कॅल्शियमचे प्रमाण खूपच कमी आहे. या स्थितीत तुम्हाला खालील लक्षणे दिसतील.

- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हात आणि पाय सुन्न होऊ शकतात. यामुळे पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे जाणवेल.

- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूमध्ये पेटके येतात आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.

-हायपोकॅल्सेमियाचा मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. यामुळे हाडांची खनिज घनता कमी होते. त्यामुळे हाडे कमकुवत होऊन फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो.

- त्वचा कोरडी पडणे हे देखील शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे. अशा स्थितीत त्वचेला ओलावा आणि निरोगी पीएच राखता येत नाही आणि त्वचेत कोरडेपणा येऊ लागतो.

- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

- कमी कॅल्शियम पातळीमुळे मुलांना मुडदूस रोग होऊ शकतो. यामुळे हाडांची मोडतोड होऊ शकते.

मज्जातंतू, स्नायू आणि हृदयाच्या कार्यासाठी कॅल्शियम आवश्यक 

महिलांमध्ये हार्मोनल बदल आणि अनेक अनुवांशिक घटकांमुळे शरीरातील कॅल्शियमच्या पातळीवरही परिणाम होतो. सतत थकवा जाणवणे आणि स्नायूंमध्ये पेटके येणे ही कॅल्शियमच्या कमतरतेची चिन्हे आहेत आणि आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज असल्याचे सूचित करते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात आणि हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हे सामान्यतः मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, नसा, स्नायू आणि हृदयाच्या योग्य कार्यासाठी देखील कॅल्शियम आवश्यक आहे.

या गोष्टींचा आहारात समावेश करा

कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात न घेतल्याने किंवा अ‍ॅलर्जीमुळे किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थांच्या असहिष्णुतेमुळे शरीरात या आवश्यक पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. कॅल्शियम हाडांच्या खनिज घनतेसाठी आणि आपल्या दंत आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. दूध, चीज, दही, भेंडी, हिरव्या पालेभाज्या, शेंगा आणि सार्डिन मासे हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. या गोष्टींचा आहारात समावेश करा.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. कृपया याची अमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)