डाळिंबाच्या सालीचा चहा एकदा पिऊन बघाच; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय, पाहा रेसिपी

Health Benefits Of Pomegranate Peel: डाळिंब तर आरोग्यासाठी गुणकारी आहेच. पण डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 26, 2023, 04:42 PM IST
डाळिंबाच्या सालीचा चहा एकदा पिऊन बघाच; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय, पाहा रेसिपी title=
Health Benefits Of Pomegranate Peel how to make peel tea

Pomegranate Peel Benefits: डाळिंब (Pomegranate) हे फळ बहुगुणकारी आहे. डाळिंबाचे दाणे खाण्याने हिमोग्लोबिन वाढते. पण तुम्हाला माहितीये डाळिंबाची सालंदेखील फायदेशीर असतात. डाळिंबाचे दाणे खाऊन झाले की त्याची सालं हमखास फेकून देतात. पण या सालांमध्येही पौष्टिक गुण असतात. या सालांमध्ये आरोग्यापासून सौंदर्यापर्यंत अनेक समस्यांवर उपाय आहेत. पण डाळिंबाची सालं अशीच खाऊ शकत नाही. अशावेळी त्यांचा सालाचा चहा पिऊन पाहा. आज आपण डाळिंबाच्या सालांचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे काय फायदे होतात. हे जाणून घेऊयात. (Pomegranate Peel Benefits In Marathi)

डाळिंबाच्या सालांचे फायदे?

डाळिंबाच्या सालांमध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात जे हायपरपिग्मेंटेशन (त्वचेचे काळे डाग) वर उपचार करण्यास उपयुक्त असतात. तसंच, डाळिंबाच्या सालीमुळे हृदय आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. डाळिंबाच्या सालीचा रस अँटी इंफ्लामेटरी एजंट म्हणून कार्य करतो जो जास्त वजन आणि लठ्ठपणा असणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारतो. या चहामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते.

डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेला चहा तुम्ही नियमित प्यायलात तर रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल, जेणेकरून तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करू शकाल. त्याचबरोबर, डाळिंबाच्या दाण्यापेक्षा त्याच्या सालीत व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात आढळते. 

डाळिंबाचा चहा कसा बनवायचा?

साहित्य

डाळिंबाचे साल, तुळस, दालचिनी,धणे आणि पाणी

कृती

वरील सर्व साहित्य एकत्र करुन पाण्यात उकळवून घ्यावे. तुम्ही घेतलेले पाणी आटून 1 ग्लास होईपर्यंत मंद आचेवर उकळवून घ्यावे. त्यानंतर एका कपात हा चहा गाळून घ्यावा. सकाळी दुधाचा चहा पिण्यापेक्षा असा चहा प्यायल्यास वजन तर कमी होईलच पण रोगप्रतिकारशक्तीही वाढेल. 

डाळिंब खाण्याचे फायदे

डाळिंब खाण्याचे आरोग्यासाठी खूपच फायदे होतात. शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होतो. तसंच स्मरणशक्ती देखील तीक्ष्ण होते. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दररोज एक डाळिंब नक्की खा. तुम्ही डाळिंबाचा रसदेखील पिऊ शकता, ज्यामुळे तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)