मुंबई : मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारतीय खाद्यसंस्कृती ही अपूर्णच वाटते. आपल्या नेहमीच्या जेवणातही आलं,लसणाचा समावेश असतो. लसूण हे आरोग्याला अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे केवळ पदार्थांची चव वाढवायला नव्हे तर काही आजारांना दूर ठेवण्यासाठीही लसणाचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. मधुमेहींपासून लठ्ठपणा कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. त्यामुळे भाजलेला लसूण रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
भाजलेला लसूण खाल्ल्याने शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते. यामुळे घातक कोलेस्टेरॉलमुळे होणारे नुकसान कमी होते.
लसणामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीही लसूण अत्यंत फायदेशीर आहे.
भाजलेल्या लसणामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये अॅन्टी एजिंग क्षमता आहे.
रात्री झोपण्यापूर्वी भाजलेला लसूण खाल्ल्याने मूत्राच्या मार्गे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांमध्ये नियमित भाजलेल्या दोन लसणाच्या पाकळ्या खाणं अत्यंत फायदेशीर आहे.