मुंबई : उन्हाळ्यात शरीराला आपण जितकं थंड आणि शांत करण्याचा प्रयत्न करु तितकंच चांगलं आहे. कारण यामुळे आपल्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. अशावेळी दुपारी बाहेरुन आल्यावरती लोकांना थंडगार पाणी प्यावसं वाटतं, ज्यामुळे आपण सगळ फ्रिजमधील पाणी काढून पितो. ज्यामुळे आपल्या शरीराचे तापमान थंड राहाते. परंतु फ्रीजचे थंड पाणी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. यामुळे तुमच्या चयापचयावर परिणाम होतो, तसेच घसा आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या वाढतात. त्यामुळे अशावेळी जेव्हा आपल्याला थंड पाणी प्यावसं वाटतं तेव्हा आपण मडक्यातील पाणी पिऊ शकतो. कारण याचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय यामुळे आपली तहान देखील भागली जाते.
उन्हाळ्यात मडक्यातील पाणी हे अमृतापेक्षा कमी नाही. हे पाणी औषधी घटकांनी समृद्ध आहे आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. या मडक्यातील पाण्याचे फायदे काय काय आहेत, जाणून घ्या.
मातीमध्ये शुद्धीकरण गुणधर्म आहेत. अशा स्थितीत हे मातीचं मडकं पाण्यात असलेले विषारी पदार्थ शोषून घेते, ज्यामुळे तुम्हाला शुद्ध आणि खनिजयुक्त पाणी प्यायला मिळते. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते.
मडक्याचे पाणी नैसर्गिकरित्या थंड आहे. तसेच पिताना ते चवदार देखील लागते. तसेच मडक्यातील पाणी रेफ्रिजरेटरच्या पाण्यापेक्षा जास्त प्रमाणात पिऊ शकतो. अशा परिस्थितीत हे पाणी तुमच्या शरीराला जास्त थंड ठेवतात, पाण्याची कमतरता भरून काढते आणि उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते. मडकाच्या पाण्यासोबत शरीराला अनेक खनिजेही मिळतात.
उन्हाळ्यात फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घसा खराब होतो, पण मडकाचे पाणी प्यायल्याने काही होत नाही. मडकाचे पाणी तुमचे शरीर थंड करते आणि वाढलेले तापमान नियंत्रित करते. पण उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
उन्हाळ्यात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास खूप वाढतो. मडकाचे पाणी तुम्हाला अशा संकटांपासून मुक्ती देते. उन्हाळ्यात रोज मडकाचे पाणी प्यायल्यास पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
उन्हाळ्यात त्वचा चिकट होते. अशा स्थितीत फोड, मुरुम आणि पुरळ यांसारख्या समस्या उद्भवतात. घागरीतील पाणी प्यायल्याने तुमच्या समस्या नियंत्रणात राहून तुमची त्वचा उजळण्यात मदत होते.