सिगारेटपेक्षा आरोग्याला धोकादायक ठरतोय मेणबत्त्यांंचा धूर

अंधार दूर करण्यासाठी तुम्ही सहाजिकच मेणबत्तीचा आधार घ्याल. मात्र काही ठिकाणी खास कॅन्डल लाईट डिनर, किंवा मेणबत्तीच्या सजवटीचं हॉटेल असतं. हे सारे तुम्हांला रोमॅन्टिक वाटत असले तरीही मेणबत्तीमुळे तुम्हांला काही त्रासदेखील होऊ शकतो. 

Updated: Apr 18, 2018, 11:29 AM IST
सिगारेटपेक्षा आरोग्याला धोकादायक ठरतोय मेणबत्त्यांंचा धूर  title=

मुंबई : अंधार दूर करण्यासाठी तुम्ही सहाजिकच मेणबत्तीचा आधार घ्याल. मात्र काही ठिकाणी खास कॅन्डल लाईट डिनर, किंवा मेणबत्तीच्या सजवटीचं हॉटेल असतं. हे सारे तुम्हांला रोमॅन्टिक वाटत असले तरीही मेणबत्तीमुळे तुम्हांला काही त्रासदेखील होऊ शकतो. 

मेणबत्ती जाळल्यानंतर त्यामधून बाहेर पडणारे घटक आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. प्रामुख्याने सुगंधित मेणबत्त्या जाळणं धोकादायक आहे. सिगारेटच्या तुलनेत मेणबत्त्यांचा धूर आरोग्याला अधिक त्रासदायक ठरतो. मेणबत्त्यांमधील धूरामुळे आरोग्याला तीन समस्यांचा धोका वाढतो. 

कोणत्या तीन समस्या वाढतात? 

अ‍ॅलर्जी 

मेणबत्त्यांमधील पॅराफिन वॅक्समध्ये सुमारे 20 विषारी घटक असतात. यामध्ये एसीटोन, फिनोल, जाइलिन, क्रेसोल आणि ब्लोरोबेंजीन हे विषारी घटक अधिक असतात. यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा धोका बळावतो. यामुळे फुफ्फुसांचे तसेच मेंदूचे आरोग्य बिघडू शकते. 

श्वास घेण्यास त्रास 

सुगंधित मेणबत्त्यांमध्ये काही खास परफ्युम मिसळली जातात.  मेणबत्त्यांमधील पॅराफिन वॅक्स अस्थमाच्या रुग्णांना त्रासदायक ठरु शकतात. मेणबत्ती जाळल्यानंतर त्यामधून एक विचित्र वास बाहेर पडतो.  हा गंध फुफ्फुसांमध्ये दाह, जळजळ वाढवतो. श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण करू शकतो.   

 डोकेदुखी  

 सुगंधित मेणबत्त्यामुळे काहींना डोकेदुखीचा त्रासही वाढू शकतो. मेणबत्त्यांमधील धूर अनेकांना त्रासदायक ठरतो.  

कोणत्या मेणबत्त्या वापरणं सुरक्षित?  

 अरोमाथेरपी किंवा इतर काही सुगंधित मेणबत्त्या विकत घेणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. 
 
 पॅराफिन कॅन्डलच्याऐवजी बिज्वॅक्स किंवा सोया कॅन्डल विकत घ्या. 
 
 जर तुम्ही सुगंधित मेणबत्त्या विकत घेणार असाल तर त्या जाळताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे मेणबत्त्यांचा धूर बाहेर जाईल.