आयुर्वेदाच्या दोषांनुसार केसांंचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणते तेल निवडाल ?

आयुर्वेदाने प्रत्येकाच्या प्रवृत्तीला तीन दोषांमध्ये विभागले आहे.

Updated: Dec 19, 2017, 09:52 PM IST
आयुर्वेदाच्या दोषांनुसार केसांंचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणते तेल निवडाल ?   title=

मुंबई : आयुर्वेदाने प्रत्येकाच्या प्रवृत्तीला तीन दोषांमध्ये विभागले आहे.

अनेकदा हे  दोष फक्त आरोग्यापुरता मर्यादीत नसते. तुम्हांला ठाऊक आहे का ? आरोग्याप्रमाणेच केसांचे आरोग्यदेखील आयुर्वेदाच्या दोषांवर अवलंबून असते. 

केसांना जपण्यासाठी तेलाचा वापरही योग्य प्रमाणात आणि दोषांनुसआर करणं  आवश्यक आहे. मग पहा केसांचे आरोग्य जपण्यासाठी नेमके कोणते तेल निवडावे ?  

वात दोष -

तुमचे केस  पातळ, शुष्क, फ्रिजी आणि दुभंगलेले असतील तर ते वात दोषातील केस समजले जातात. याकरिता बदामाचे तेल, तीळाचे तेल  यांचा बेस तेल म्हणून वापर करावा. या तेलामुळे टाळूचे आरोग्य सुधारते. टाळूतील जाडसरपणा कमी होतो.  

कफ दोष  -

जाड आणि तेलकट केस म्हणजे तुमचे केस कफ प्रवृत्तीतील आहेत. तीळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल यांची निवड करा. ऑलिव्ह ऑईलमुळे छिद्र मोकळी होतील.  

पित्त दोष -

अकाली तुमचे केस विरळ, पातळ किंवा पांढरे होत असतील तर तुमचे केस पित्त प्रवृत्तीचे आहेत. याकरिता नारळाचे तेल फायदेशीर आहे. तुमचे पित्त वाढले असेल तर तेलाचा मसाज फायदेशीर आहे.