Hair Care Tips in Marathi : आजकालची जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची काळजी न घेणे, त्याचप्रमाणे काही वेळा अनुवांशिक कारणांमुळे देखील केस गळू शकता. आपल्या दिसण्यामध्ये केस खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही देखील केस गळतीच्या समस्येने हैराण असाल तर तुमच्या आहारातील या चुका करणे थांबवा..
- जर तुम्ही साखरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचा परिणाम केसांवर होतो. त्यामुळे केस खराब होतात आणि केस गळण्याचे प्रमाण ही वाढते.
- रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे हे मधुमेहाचे नसून केस गळण्याचे कारणही असू शकते. यामुळे गोड पदार्थ खाताना काळजी घेणे आवश्यक आहे.
- जर तुमच्या आहारात जंक फूडचे प्रमाण जास्त असेल तर ते टाळणे आवश्यक आहे. जंक फूडचे सेवन केल्याने केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.
- फास्ट फूड, जंक फूड जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. त्याचे दुष्परिणाम केसांवरही होऊ शकतो.
- थंड पेय किंवा इतर गोड पेये जास्त प्रमाणात पित असाल तर आजच पिणे बंद करा. यामुळेही केसगळतीचे प्रमाण वाढू शकते.
- बाजारात मिळणारे कोणतेही पेय आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत. यामुळे केस गळू शकतात.
- दारू पित असाल तर याचाही केसांवर वाईट परिणाम होतो. केस गळण्याचे प्रमाण वाढून टक्कल पडू शकते.
- केस गळणे थांबवण्यासाठी तुमचा आहार खूप महत्त्वाचा आहे. जीवनसत्त्वे, लोह, फायबर, खनिजे, ज्यामुळे पोषण मिळते, असा आहार नियमितपणे घ्यावा.
- माणसाला जिवंत राहण्यासाठी केस महत्त्वाचे नाहीत त्यामुळे शरीर (आरोग्य) केसांच्या वाढीसाठी पोषक तत्वांचा वापर करण्याला महत्त्व देत नाही, त्यामुळे केसांना पोषण मिळावे, असा आहार घ्या.
- एका संशोधनानुसार दारूच्या व्यसनामुळे केस कमकुवत होतात. त्यांची मजबुती कमी होते आणि ते लवकर गळू लागतात.
चीनची राजधानी बीजिंग येथील सिंघुआ विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की कोक, पेप्सी किंवा एनर्जी ड्रिंक्स यांसारखे एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने केस गळून पडण्याची शक्यता आहे. जे पुरुष दररोज असे पेय पितात किंवा 1 ते 3 लिटर पेये पितात. आठवडाभर त्यांना बद्धकोष्ठतेची समस्या तीव्र होते. वेग वाढतो. जे लोक साखरयुक्त शीतपेय पितात त्याची केस गळण्याती समस्या ४२% आहे. ज्या पुरुषांनी मान्य केले की केस गळत आहे, त्याचे असे म्हणे होते की ते आठवड्यात 12 वेळा सॉफ्ट ड्रिंक्स पितात.
( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )