तुमच्या या सवयींमुळे होऊ शकते ब्रेकअप !

अनेकांना एकटं राहण्याची भीती वाटत असते. 

Updated: Aug 27, 2018, 12:05 PM IST
तुमच्या या सवयींमुळे होऊ शकते ब्रेकअप !  title=

मुंबई : अनेकांना एकटं राहण्याची भीती वाटत असते. मग रिलेशनशीपमध्ये राहणं त्यांना सुरक्षित आणि फायद्याचं वाटतं. मात्र प्रत्येक रिलेशनशीप ही परफेक्ट असेलच असे नाही. सुरूवातीला आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहून मन खूष होऊन जाते मात्र जसजसा वेळ जातो तशी एक्सायमेंट कमी होते. त्याचा रिलेशनशीपवर परिणाम होऊ शकतो. काही वेळेस नात्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा, सवयींचा वीट येऊ शकतो. 

सतत लक्ष ठेवणं - 

नात्यामध्ये विश्वास गरजेचा आहे. कधीकधी यासाठी नात्यामध्ये तडजोड करावी लागणं अविभाज्य असते. अशावेळेस तुम्ही साथीदारावर सतत लक्ष ठेवून राहणं चूकीचे आहे. 

ड्रामा क्वीन - 

मुलींचा ' ड्रामा क्वीन' स्वभाव, त्यांचं लहान मुलांप्रमाणे हट्टी वागणं कालांतराने मुलांना नकोशा वाटतात. सार्वजनिक ठिकाणी मुलींचे नखरे सांभाळणं त्यांना नकोसे वाटते. 

खोटं बोलणं - 

साथीदारापासून काही गोष्टी लपवणं हे काही प्रमाणात ठीक आहे. मात्र रिलेशनशीपमध्ये सतत काही वेळ खोटं बोलणं नात्यावर गंभीर परिणाम करण्यास कारणीभूत ठरू शकते. 

पुन्हा पुन्हा कबुली, प्रशंसा मागणं - 

नात्यामध्ये साथीदाराकडून लहान लहान गोष्टींबाबत कबुली मागणं, प्रसंसा मागणं हे नात्याला हानीकारक आहे. यामुळे समोरची व्यक्ती कालांतराने वैतागू शकते. 

सतत एकत्र राहणं - 

तुम्ही रिलेशनशीपमध्ये असलात तरीही तुमच्या नात्यामध्ये दोघांनाही 'स्पेस' आवश्यक आहे. त्यामुळे सतत एकसाथ राहण्याचा हट्ट नात्याला मारक ठरू शकतो. तुम्हांला एकमेकांचा कंटाळा येऊ शकतो. 

संधीसाधूपणा - 

जेव्हा खरंच गरज असते तेव्हा हक्काने भांडा मात्र प्रत्येक वेळेस आपलंच बरोबर आहे यासाठी हेकेखोर होऊन भांडू नका. हेकेखोर स्वभावामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. 

तुलना करणं - 

काही कारणास्तव तुमच्या आयुष्यात नवं नातं येते. परंतू कधीच तुमच्या आयुष्यातील नाती इतरांसोबत तुलना करू नका. तुमच्या एक्ससोबत साथीदाराची प्रत्येक गोष्टीवर तुलना करू नका.