आश्चर्यकारक ! डॉक्टरांआधीच 'हे' बांधणार मृत्यूचा अचूक अंदाज

गूगलची 'मेडिकल ब्रेन' टीम आता रूग्णाच्या मृत्यूबाबतचा अंदाज वर्तवणार आहे. 

Updated: Jun 20, 2018, 04:45 PM IST
आश्चर्यकारक !  डॉक्टरांआधीच 'हे' बांधणार मृत्यूचा अचूक अंदाज title=

अमेरिका  : गूगलची 'मेडिकल ब्रेन' टीम आता रूग्णाच्या मृत्यूबाबतचा अंदाज वर्तवणार आहे. याकरिता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या प्रयोगात या आर्टिफिशिअल ब्रेनचा अचूक अंदाज वैद्यकीय तज्ञांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. 

कशी होणार मदत ? 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने रूग्णाच्या आरोग्याबाबत काही अंदाज वर्तवले जाणार आहेत. यानुसार रूग्णाच्या मृत्यूचाही आंदाज बांधता येणार आहे. 

यंदा गूगलने जाहीर केलेल्या अहवालानुसार, एका स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलेवर प्रयोग करण्यात आला. त्यानुसार, रूग्णालयात 24 तासात अ‍ॅडमिट झाल्यानंतर गूगलने हॉस्पिटलमध्ये मृत्यू होण्याची तिची शक्यता सुमारे 19.9 % वर्तवली होती. तर हॉस्पिटलच्या अर्ली वॉर्निंग रेटींगनुसार ही शक्यता केवळ 9.3 % होती. या महिलेचा दहा दिवसांमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे भविष्यात गूगलच्या या नव्या प्रयत्नामुळे तंत्रज्ञान आणि आरोग्यक्षेत्र सांगड वैद्यकीय सेवेसाठी फायदेशीर ठरणार आहे.   

भविष्य काय ?

गूगलच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टीमला भविष्यात वैद्यकीय सुविधा अधिक स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याकडे अधिक भर आहे. केवळ मृत्यूची शक्यता वर्तवण्यापेक्षा रूग्णच्या रिपोर्ट्सवरून आजाराची लक्षण आणि धोका ओळखणं शक्य करण्याकडे अधिक भर दिला जाणार आहे.