Heart Attack पूर्वीच मिळणार अलर्ट; हातावरचं घड्याळ देणार हार्ट अटॅकचा अलार्म

संशोधकांनी हार्ट अटॅकचं फक्त 30 सेकंदात निदान करणारं स्मार्ट वॉच विकसित केलंय. हे स्मार्ट वॉच हार्ट अटॅकचं मुख्य कारण असलेल्या 'ट्रोपोनिन' च्या पातळीची अचूक माहिती देणार आहे. भारतातल्या 230 रुग्णांवर या स्मार्ट वॉचची यशस्वी चाचणी पार पडली.

Updated: Mar 16, 2023, 03:23 PM IST
Heart Attack पूर्वीच मिळणार अलर्ट; हातावरचं घड्याळ देणार हार्ट अटॅकचा अलार्म

Heart Attack : रोजच्या धकाधकीच्या जगण्यात हार्टअटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय....कुणाला लग्नसमारंभात हार्टअटॅक येतोय.....तर कुणाचं नाचता नाचता हार्ट फेल होतंय...मात्र आता हार्ट अटॅक येण्याआधी तुम्हाला अलार्म मिळणार आहे आणि हा अलार्म तुमच्या हातावरचं घड्याळ देणार आहे.  

संशोधकांनी हार्ट अटॅकचं फक्त 30 सेकंदात निदान करणारं स्मार्ट वॉच विकसित केलंय. हे स्मार्ट वॉच हार्ट अटॅकचं मुख्य कारण असलेल्या 'ट्रोपोनिन' च्या पातळीची अचूक माहिती देणार आहे. भारतातल्या 230 रुग्णांवर या स्मार्ट वॉचची यशस्वी चाचणी पार पडली. नागपूरचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी हे स्मार्ट वॉच तयार केलंय.

नेमकं हे स्मार्ट वॉच कसं काम करतं 

  • हार्ट अटॅक आल्यावर रक्तातलं 'ट्रोपोनिन' वाढतं
  • 'ट्रोपोनिन'ची तपासणी केल्यावरच हार्ट अटॅकचं निदान होतं
  • स्मार्ट वॉचमुळे 'ट्रोपोनिन'चं रक्त तपासणीशिवाय अचूक निदान शक्य आहे
  • दुखण्याकडे दुर्लक्ष करणा-यांसाठी हे स्मार्ट वरदान ठरु शकतं
  • अमेरिका आणि युरोपमध्येही स्मार्ट वॉचचं स्वागत करण्यात आलंय.

डॉ. सेनगुप्ता यांनी तयार केलेल्या या स्मार्टवॉचची चाचणी वर्षभर पाच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सुरू होती. रक्त तपासणी आणि या स्मार्ट वॉचनं केलेलं निदान यांचे 98 टक्के नमुने जुळलेत. आता या स्मार्ट वॉचची स्टेज 4 ची चाचणी यशस्वी झाली की हार्ट अटॅकचं निदान करणारं स्मार्ट वॉच बाजारात येणार आहे.