रोज सकाळी घ्या लसणाचा चहा, होणार हे ५ चमत्कारीक फायदे!

लसूण अशी एक गोष्ट आहे ज्याच्या सेवनाने केवळ स्वादच येत नाही तर त्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते.

Updated: Jan 23, 2018, 10:20 AM IST
रोज सकाळी घ्या लसणाचा चहा, होणार हे ५ चमत्कारीक फायदे! title=

मुंबई : लसूण अशी एक गोष्ट आहे ज्याच्या सेवनाने केवळ स्वादच येत नाही तर त्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते. लसूणला वरदान असलेलं औषध मानलं जातं. रोजच्या भाज्यांमध्ये आपण लसूण खातोच. पण आज आम्ही तुम्हाला लसणाच्या चहाचे फायदे सांगणार आहोत.

लसणाच्या चहासाठी सामग्री

१ लसणाची कळी
२ छोटे ग्लास पाणी
१ चमचा सहद
१ चमचा लिंबूचा रस
१ चिमटी किसलेले अद्रक

कसे कराल तयार

सर्वातआधी एक ग्लास पाणी उकळून त्यात लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाका. आता ते साधारण १५ मिनिटे हलक्या आसेवर शिजू द्या. चांगली उकळी आल्यावर ते १० मिनिटे तसेच राहूद्या. आता ते गाळून त्यात एक चमचा लिंबूचा रस आणि एक चमचा सहद घाला. तुमचा लसणाचा चहा तयार आहे. 

लसणाच्या चहाचे फायदे

- सकाळी रिकाम्या पोटी लसणाचा चहा पिल्यास शरीराचं मेटाबोलिज्म ठिक राहतं आणि पचनक्रियाही ठिक राहते. 

- हृदयाशी निगडीत रोगांनाही पळवण्यासाठी हा चहा खूप फायद्याच आहे. हा चहा ब्लड सर्कुलेशन सामान्य ठेवतो.

- लसणाच्या चहाचे सेवन केल्यास शरीरातील टॉक्सिक पदार्थ दूर होतात. सोबतच शरीरातील एक्स्ट्रा फॅटही बर्न होतात. 

- लसणाचा चहा घेतल्याने शरीराची इम्युनिटी वाढते. त्यामुळे शरीराला अनेक रोगांसोबत लढण्याची मदत मिळते. 

- ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल लेव्हल नेहमी वाढलेलं असतं, त्यांच्यासाठी हा चहा अमृत असल्याचं सांगतात. 

- लसणाच्या चहात तुम्हाला अ‍ॅन्टीबायोटीक मिळतं ज्याने सर्दी, पळसा आणि खोकला या समस्या दूर होतील.