नवी दिल्ली : आरोग्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. काही ठराविक पदार्थांपासून आपल्याला विशिष्ट पोषकघटक मिळत असतात. जे विशिष्ट अवयवयांसाठी महत्त्वाचे आणि गरजेचे ठरतात. डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव. त्याशिवाय आपले जीवन म्हणजे अंधःकार. म्हणून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच आपल्या जीवनशैलीमुळे आपण अधिक वेळ कम्प्युटर किंवा मोबाईलसमोर असतो. त्यामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. त्याचबरोबर आजकाल मधूमेह सामान्य झाला आहे. त्याचाही डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स...