चिकनगुनियाचा सामना करण्यासाठी फायदेशीर '6' पदार्थ

पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिक असतो.

Updated: Jul 25, 2018, 12:54 PM IST
चिकनगुनियाचा सामना करण्यासाठी फायदेशीर '6' पदार्थ  title=

मुंबई : पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. डास चावल्याने डेंगी, मलेरिया, चिकनगुनियाचा धोका वाढतो. ताप हे सार्‍या साथीच्या आजारांमध्ये समान दिसणारं लक्षण असल्याने नेमका काय त्रास होतोय? हे अनेकांच्या लक्षात येत नाही.  नक्की वाचा : ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल ...

चिकनगुनियाच्या आजारामध्ये तापासोबतच सांध्याचे दुखणे वाढते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास सांध्याचे दुखणे दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकते. डेंगीचा 'ताप' यंदा वाढण्याची शक्यता, व्हायरसचं नव रूप अधिक धोकादायक

चिकनगुनियाची लक्षण 

WHO या जागतिक आरोग्यसंस्थेच्या अहवालानुसार, संसर्ग झालेल्या डासांच्या विळख्यात एखादा रूग्ण आल्यास त्याच्यामध्ये चिकनगुनियाची लक्षण आढळण्यास सुमारे 4-7 दिवसांमध्ये ती स्प्ष्टपणे दिसतात. 

चिकनगुनियाचे निदान वेळीस झाल्यास त्यावर उपचाराने मात करणं शक्य आहे. त्यामुळे औषधोपचारांसोबत आहाराचं पथ्यपाणी सांभाळत तुम्ही चिकनगुनियाचा सामना करू शकता.  

सफरचंद - 

सफरचंदामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी, कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत  होते. 

नारळपाणी - 

नारळपाणी रूग्णांसाठी फायदेशीर आहे. चिकनगुनियाच्या रूग्णांसाठी नारळपाणी पिणं फायदेशीर आहे. यामुळे शरीर डिहायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. सोबतच डिटॉक्सिफाय होण्यासही मदत होते.  

हिरव्या पालेभाज्या  - 

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे पचनक्रियेला चालना मिळते. प्रामुख्याने पालेभाज्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए आणि  व्हिटॅमिन सी घटक हाडांचं नुकसान टाळण्यासाठी मदत करते. 

व्हिटॅमिन्स - 

व्हिटॅमिन सी घटक हाडांना मजबुती देतात मसल्स मजबूत करतात. तर व्हिटॅमिन ई घटक त्वचा मुलायम ठेवण्यास मदत करतात. यासाठी आहारात किवी, ब्रोकोली, टोमॅटो, सुकामेवा यांचा समावेश करा. 

लिक्विड फूड - 

आजारपणामध्ये पचायला जड पदार्थ खाणं शक्य नसते. यामुळे सूप्स, डाळ, पेज असे पदार्थ आहारात ठेवा. प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होण्यासाठी माशांचा सूप्समध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करा.  

ओमेगा3 फॅटी अ‍ॅसिड - 

आहारात अक्रोड, अळशी, माशांचा समवेश करा. यामधून शरीराला ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो.