दिवसातून किती तास वापरले पाहिजेत कॉन्टॅक्ट लेन्स? जाणून घ्या

जाणून घेऊया कॉन्टॅक्ट लेन्स दिवसांतून किती वेळ वापरले पाहिजेत.

Updated: Apr 19, 2022, 12:24 PM IST
दिवसातून किती तास वापरले पाहिजेत कॉन्टॅक्ट लेन्स? जाणून घ्या title=

मुंबई : पूर्वी चष्म्यापासून सूट मिळाली म्हणून लेन्सचा वापर केला जायचा. मात्र आता फॅशन म्हणून लेन्सचा वापर होताना दिसतो. मात्र अजूनही अनेकांच्या मनात प्रश्न असा आहे की, लेन्सचा वापर करणं सुरक्षित आहे का? यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया कॉन्टॅक्ट लेन्स दिवसांतून किती वेळ वापरले पाहिजेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कॉन्टॅक्ट लेन्सचा दीर्घकाळ वापर केल्याने डोळ्यांना इजा होऊ शकते. यामुळे डोळ्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता देखील होऊ शकते. 

ज्यावेळी आपण कॉन्टॅक्ट लेन्स वापरतो तेव्हा ते संपूर्ण कॉर्निया कव्हर होतो. त्यामुळे डोळ्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने डोळ्यांवर ताणंही येऊ शकतो. 

किती वेळ कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करावा

कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दिवसातील 10 तासांपर्यंत यांचा वापर करणं सुरक्षित आहे. यावेळी स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो.

कोणती काळजी घ्याल?

कॉन्टॅक्ट लेन्सला स्पर्श करण्यापूर्वी हात साबणाने धुवा आणि स्वच्छ टॉवेलने वाळवा. यानंतर टिश्यू पेपरने हात पुन्हा स्वच्छ करा. लेन्स काढण्यापूर्वी आणि लावण्यापूर्वी, लेन्स लिक्विडने स्वच्छ करा. प्रत्येक वेळी तुम्ही लेन्स साफ करता तेव्हा नवीन लिक्विड वापरा आणि वापरलेलं लिक्विड पुन्हा वापरू नका.