महिलांसाठी महत्त्वाची बातमी; प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी 'या' पाच पदार्थांचे करा सेवन

Fertility Rate in Women: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना बरेचसे प्रेग्नंन्सी प्रोब्लेम्सही (Pregnancy) सतावू लागतात. त्यातून अनेक स्त्रिया या नोकरी करतात त्यामुळे त्याच्यातही प्रजनन क्षमता (Fertility) कमी असल्याचे दिसून येते.

Updated: Jan 17, 2023, 09:55 PM IST
महिलांसाठी महत्त्वाची बातमी; प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी 'या' पाच पदार्थांचे करा सेवन title=

Fertility Rate in Women: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना बरेचसे प्रेग्नंन्सी प्रोब्लेम्सही (Pregnancy) सतावू लागतात. त्यातून अनेक स्त्रिया या नोकरी करतात त्यामुळे त्याच्यातही प्रजनन क्षमता (Fertility) कमी असल्याचे दिसून येते. नोकरी, घर-संसार, लग्न आणि वैयक्तिक आयुष्य या सगळ्याच बलॅन्स राखता राखता त्यांच्या नाकीनऊ येतात त्यामुळे अशावेळी आहार हा खूप महत्त्वाचा असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण पाहतो की महिला आपल्या आरोग्याच्या दृष्टीनंही फार हलगर्जीपणा (Healthy Diet) करताना दिसतात. आपल्या आरोग्याची नीट काळजी घेत नाहीत. त्यातून आपल्या आहाराकडेही त्यांचे अनेकदा दुर्लेक्ष होताना दिसते. त्यामुळे अशावेळी त्यांनी त्यांच्या आहराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे ठरते. चला तर मग जाणून घेऊया की असे कोणते पाच पदार्थ आहेत ज्याचं सेवन महिला आपली प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी करू शकतात. (female can eat these food for better fertility know more in detail)

हल्ली स्त्रियांमध्ये जंग फूड खाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांचे आपल्या डाएटकडे अनेकदा दुर्लेक्ष होताना दिसते. नैसर्गिक आणि घरी बनवलेले पदार्थ त्यांच्याकडून फार कमी वेळा खाल्ले जातात. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी महिलांना खालील आहारांचा समावेश करणं चांगले ठरेल यानं तुमची प्रजनन क्षमता वाढण्यासही मदत होईल. 

गायीचे दूध (Cow Milk)

गायीच्या दूध हे प्रेग्नंन्सीसाठी चांगले मानले जाते. यात व्हिटॅमिन ए, डी आणि ई असते. यामध्ये सॅच्यूरेडेट फॅट्स असतात. त्यामुळे तुमची प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी तुम्ही गायीच्या दुधाचे सेवन करू शकता. यानं तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

अंजीर  (ANJEER)

अंजीर हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते म्हणजे या मासिक पाळीसाठीही या फळाचा महिलांना चांगला उपयोग होतो. ज्यांना पीसीओएस आहे त्यांच्यासाठी या फळाचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर हे इन्सुलिनचं प्रमाण कमी करण्यास मदत करते. 

काजू (cashew)

काजू हा पदार्थ अनेकदा आपल्याकडून खाल्ला जातो, कधी आपण गोड पदार्थांसोबत खातो तर कधी नुसते काजूही खाण्याची आपल्याला सवय असते. चणे, दाळं, दलिया, डार्क चॉकलेटही खाऊ शकता. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असते. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला तुमची प्रजनन क्षमता वाढविण्यासाठीही होऊ शकतो. 

दालचिनी (dalchini)

दालचिनीही महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर मासिक पाळीसाठीही दालचिनी मदत करते. जर तुम्हाला मासिक पाळीत खूप जास्त फ्लो होत असेल तर त्यासाठी दालचिनी फायद्याची ठरते. यामध्ये मेटाबॉयलिझम वाढवण्याचाही क्षमता असते. 

डाळिंब (Promogrenate)

डाळिंबात व्हिटॅमिन सी, के अशी पोषक तत्त्वे असून डाळिंबात महिलांसाठी खूप चांगले गुणधर्म असतात. महिलांसाठीच नाही तर पुरूषांसाठीची प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी डाळिंब मदत करू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)