Father's Day:हटके गिफ्ट देऊन बाबांना करा खूश!

....

Updated: Jun 17, 2018, 12:43 PM IST
Father's Day:हटके गिफ्ट देऊन बाबांना करा खूश! title=

मुंबई: आईबद्धल सगळेच भरभरून बोलतात. ते बोलयलाही पाहिजे. आईच्या हळव्या प्रेमासोबत खंबीरपणे उभा असतो तो बाबा. बाबांबद्धल तितके बोलले जात नाही. बाबा नेहमीच आपल्या भावना व्यक्त करून दाखवत नसतील म्हणून असेल कदाचित. अशा या काहीशा तापट, अबोल पण तितक्याच प्रेमळ बाबांच्या मुलांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज फादर्स डे आहे. आजच्या या विशेष दिनी आपण बाबांना एक हटके गिफ्ट देऊन खूश करू शकता...

काय द्याल गिफ्ट? 

शर्ट

चांगले कपडे वापरायला सर्वांनाच आवडते. त्यात सर्वांचे बाबा येतात. पण, अनेकदा नेहमीच्या ताण-तणाव आणि संघर्षात बाबा कपड्यांना तितके महत्त्व देत नसावेत. म्हणूनच तुमच्यासठी ही संधी छान आहे. आज तुम्ही बाबांना छानसा शर्ट देऊन खूश करू शकता.

शूज किंवा सॅँडल

नुकताच उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत आहे. अशा वेळी तुम्ही बाबांन एखादा शूज किंवा छानसा सँडलचा जोडही गिफ्ट करू शकता. तुम्ही दिलेले सरप्राईज पाहून त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पहायला मित्र तुम्ही विसरू नका. 

एग्जीक्यूटिव्ह बॅग 

बाबा जर नेहमी प्रवास करत असतील तर, त्यांच्यासाटी एग्जिक्युटिव्ह बॅग हा चांगला ऑप्शन आहे. या बॅगचा वापर ते ऑफिस, प्रवास आणि इतर महत्त्वाच्या वेळी करू शकतात.

सीडी

प्रत्येकाच्या बाबाला आपला भूतकाळ. भुतकाळातील चित्रपट, गाणी प्रचंड आवडतात म्हणूनच तुम्ही जर जुन्या चित्रपट, गाणी आदींची सीडी गिफ्ट द्याल तर ते जाम खूश होतील. 

दरम्यन, वर सुचवलेल्या पर्यायांसोबतच तुम्ही एखादे रिस्ट वॉच फरफ्यूम किंवा शेव लोशनही देऊ शकता. जेनेकरून ते खूश होतील.