मुंबई : बाहेरचं खाणं खाण्यास कोणाला आवडतं नाही. हॉटेलमध्ये मिळणारं फास्ट फूडमुळे अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं अधिकचं अनसेफ झालं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आठवड्यातून एखादं वेळेस बाहेरचं खाणं खाल्ल्यास काही त्रास नाही. मात्र जर तुम्ही दररोज बाहेरचं खाणं खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरू शकतं. नागरिकांमध्ये सुरक्षित आणि पौष्टिक आहाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी ७ जून रोजी अन्न सुरक्षा दिवस पाळण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया अति प्रमाणात बाहेरचं खाणं खाल्ल्यास काय त्रास होऊ शकतो.
Food Institute Analysis of Data from the Bureau of Labor Statisticsच्या अनुसार, लोकं आपल्या जेवणाच्या बजेटवरील 45 टक्के खर्च रेस्टॉरंटवरच्या खाण्यावर खर्ची घालतात. बघूया हेच अन्न आपल्या शरीरासाठी कसं नुकसानदायक ठरतं.
फास्टफूडमध्ये साखरेचं प्रमाण असतं. जी शरीरासाठी फायदेशीर नसते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, दिवसाला केवळ 100-150 कॅलरी अतिरिक्त साखरेचं सेवन करण्याचा सल्ला देतं. याचा अर्थ केवळ ६ ते ९ चमचे. मात्र खाद्यपदार्थांमध्ये अतिरीक्त साखर असते जी नुकसानदायक ठरते.
फास्ट फूडमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. या पदार्थांमधून कार्ब तुमच्या रक्ताच्या फ्लोमधून ग्लुकोजच्या स्वरूपात बाहेर पडतं. ज्यामुळे ब्लड शुगर लेवल वाढते. परिणामी शरीरातील इन्सुलिनच्या प्रक्रियेतही चढ-उतार निर्माण होतो. आणि टाईप-२ मधुमेहाची शक्यता बळावते.
फास्ट फूडच्या सेवनाने दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. फास्ट फूडमध्ये असलेल्या कार्ब आणि साखरेमुळे अॅसिड निर्माण होतं. ज्यामुळे दातांमधील इनामेल नष्ट होतं आणि दात किडण्याची शक्यता वाढते.