Does Kissing Causes Mouth Cancer? What Report Says: सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची समस्या (Health Issues in Youth). त्यामुळे अनेकदा आपल्याला त्यासंबंधीची काळजी घ्यावी लागते. आजकाल तरूणांचीही जीवनशैली (Lifestyle) ही बदललेली आहे त्यामुळे त्यांच्यासाठीही आरोग्याच्या बाबतीत अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. किसिंग (Kissing) ही एक प्रेम व्यक्त करण्याची एक कृती आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला किस करण्याची संस्कृती खूप जूनी आहे. आपल्या येथेही आता आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला किस करणं हे फार कॉमन झालं आहे. सिनेसृष्टीत ही परंपराही आता फार सहजी पाहायला मिळते. असंही म्हटलं जातं की, आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला किस केल्यानं तोंडाच्या कर्करोगाचा धोका संभावतो?
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (Human papilloma virus) हा चुंबनानं पसरणारा व्हायरल आहे. हे इन्फेक्शन ऑरल सेक्स किंवा फ्रेंच किसिंगनं होऊ शकते. यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता संभावते. परंतु काही वैद्यकीय तज्ञांच्या मते, किस केल्यानं कर्करोगाचा धोका संभावत नाही कारण कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाही. त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.
यातही काळजी करण्याची गरज नसते कारण 100 वेगवेगळ्या कर्करोग आजारांपैंकी फक्त 15 प्रकांरातून कर्करोग होण्याची भिती असते. असं असलं तरी ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमधून तोडांचा कर्करोग होण्याचा धोका हा फार मोठा असतोच. इंग्लंडच्या कॅन्सर रिसर्च रिपोर्टमधून (Cancer Research Report, UK) असं सांगण्यात आलं आहे की, 40 % कर्करोगाचा धोका हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मधून होतो. इंग्लंडच्या कॅन्सर रिचर्स अहवालातून असे सांगण्यात आले होते की, एचव्हीपीचा 10 पैंकी 8 लोकांना धोका असतो.
डेली मेलच्या अहवालानुसार, ज्यांना ऑरोफरीनक्समध्ये एचव्हीपीची लागण झाली आहे त्यांना इतरांपेक्षा 250 पट जास्त कर्करोगाचा धोका असतो. एचव्हीपी हा गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाशीही संबंधित आहे. स्त्री आणि पुरूष यांनाही ते प्रभावित करते. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय डॉक्टरांचा असा समज आहे की, प्रामुख्यानं फ्रेंच किसनं आणि ऑरल सेक्सनं हा धोका संभावतो. त्यातून जर का समोरच्या व्यक्तीला या व्हायरसची लागण झालेली असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीला किस केल्यावर हा व्हायरस दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होण्याचीही भिती असते. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, 40 ते 50 या वयोगटातील लोकांना याचा जास्त धोका आहे. परंतु हे इन्फेक्शन रोखण्यासाठी तशी काळजीही घेणे गरजेचे आहे.
आपल्या आपल्या आपल्या परीनं असे इन्फेक्शन रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो. कोणाचंही उष्ट खाणं टाळा. आपल्या खाण्यात योग्य लक्ष द्या. कोणाची लाळ आपल्या तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्या. किस करताना आपल्या ओठांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)