तुम्ही देखील तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका करता का? त्या आताच सुधारा

तुम्हाला माहितीय का? तुम्ही जर योग्य प्रकारे त्याचे सेवन केले नाही तर त्याच्या फायद्याऐवजी तुम्हाला नुकसानच होऊ शकते. 

Updated: Jun 23, 2022, 09:13 PM IST
तुम्ही देखील तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका करता का? त्या आताच सुधारा title=

मुंबई : असे सांगितले जाते की, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. ज्यामुळे बरेचसे लोक या पर्यायांकडे वळले आहे आणि या भांड्यासाठी लोकांनी जास्तीचे पैसे देखील गुंतवले आहे. परंतु तुम्हाला माहितीय का? तुम्ही जर योग्य प्रकारे त्याचे सेवन केले नाही तर त्याच्या फायद्याऐवजी तुम्हाला नुकसानच होऊ शकते. जाणून घ्या कोणत्या वेळी हे पाणी पिणे चुकीचे आहे आणि तुम्हाला यामुळे कोणते नुकसान सहन करावे लागू शकते.

जर तुम्ही रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पीत असाल, तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याचबरोबर जेवल्यानंतरही हे पाणी पिणे टाळावे. आयुर्वेदानुसार असे आरोग्यदायी पाणी सकाळी प्यावे.

काहीवेळा लोक निरोगी राहण्यासाठी अन्नाशी संबंधित चुकीच्या मार्गांचा अवलंब करू लागतात. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी मर्यादित प्रमाणात प्यावे. त्यामुळे जर तुम्ही जर तुम्ही त्याला 2 लिटरपेक्षा जास्त प्रमाणात प्यायल्यात तर तुम्हाला पोटदुखी, गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

तुम्हाला माहित आहे का की, शरीरातील अतिरिक्त कॉपर यकृताच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे चांगले आहे, परंतु ते मर्यादित प्रमाणात प्या आणि निरोगी रहा. तुम्ही जर सारखं सारखं यामधील पाणी पित असाल, तर यामुळे तुम्हाला धोका आहे.

जेव्हा तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवता तेव्हा ते जमिनीवर ठेवू नका हे लक्षात ठेवावे. ते ठेवण्यासाठी नेहमी लाकडी स्टूल किंवा इतर वस्तू वापरा. असे केल्याने तांब्याची शुद्धता राहते असे म्हणतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)